22 September 2020

News Flash

‘या’ अभिनेत्रीला टॉयलेटमध्ये करावं लागलं बाळाला स्तनपान

एका मुलाखतीमध्ये तिने हा खुलासा केला आहे

नोकरी, व्यवसाय करणाऱ्या आजच्या स्त्रीला आपल्या बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान देता यावे यासाठी कौटुंबिक, सामाजिक, कार्यालयीन पातळीवर सहकार्य मिळण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील अनेक अभिनेत्री यासाठी प्रयत्न करत आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेत्रीही मागे नाहीत. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या मुलीला सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना येणााऱ्या अडचणी सांगितल्या आहेत. या अभिनेत्रीने तिच्या बाळाला टॉयलेटमध्ये स्तनपान करावे लागल्याचे सांगितले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीने हा खुलासा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून नेहा धूपिया आहे. नेहाने एका मुलाखतीमध्ये तिच्या मुलीला स्तनपान करताना सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या अडचणींचा खुलासा केला आहे. ‘मी विमानाच्या टॉयलेटमध्ये, कारमध्ये, झाडाच्या मागे काही वेळा तर कॅमेरासमोर देखील माझ्या मुलीला मेहेरला स्तनपान केले आहे. पण मला असे वाटते की आम्हाला आमच्या लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी चांगली जागा मिळायला हवी. आमच्या बाळांना आम्ही टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे?’ असे नेहा म्हणाली आहे.

‘मुलांना निरोगी ठेवण्यासाठी स्तनपान हा चांगला पर्याय आहे. मात्र लोकांनी यावरुन कोणाबद्दल मते तयार करु नये कारण प्रत्येक महिला, प्रत्येक आईसाठी परिस्थिती वेगवेगळी असू शकते’ असे नेहा पुढे म्हणाली आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने #Freedomtofeed मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत ती पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांनी बाळाला काय खायला द्यावे आणि काय देऊ नये याबाबत जागरुक करते. नेहाच्या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१८मध्ये नेहाने मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव मेहेर असे ठेवले. काही दिवसांमध्येच मेहेर वर्षांची होईल. नेहा बराच वेळा मुलीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मात्र तिने अद्याप मेहेरचा चेहरा दाखवला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 2:18 pm

Web Title: this bollywood actress breastfeed his baby in toilet avb 95
Next Stories
1 Video : ‘हिरकणी’ साकारण्याविषयी सोनाली सांगते…
2 ‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमासाठी पाच मराठी चित्रपटांची निवड
3 मीराच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी शाहिद म्हणतो…
Just Now!
X