बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात तर काही फ्लॉप ठरतात. आता बॉलिवूडमध्ये वर्षभरात कोणती अभिनेत्री प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरली आहे हे समोर आले आहे. या अभिनेत्रीचे संपूर्ण वर्षात पाच चित्रपट प्रदर्शित झाले असून तिच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे.

ही अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. झूमने दिलेल्या वृत्तानुसार तापसीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. त्यामुळे ती बॉलिवूडमधील मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीमधील यशस्वी अभिनेत्री ठरली आहे. तापसीच्या सर्व चित्रपटांनी मिळून एकूण ३५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘बदला’ (८ मार्च २०१९)- ८८ कोटी रुपये कमाई
‘गेम ओव्हर’ (१४ जून २०१९) – ४.६९ कोटी रुपये कमाई
‘मिशन मंगल’ (१५ ऑगस्ट २०१९)- २०२.९८ कोटी रुपये कमाई
‘सांड की आँख’ (२५ ऑक्टोबर २०१९)- २३.४० कोटी रुपये कमाई
‘थप्पड’ (२८ फेब्रुवारी २०२०) – ३३.०६ कोटी रुपये कमाई

एकूण वर्ष भरातील चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाई ३५२.१३ कोटी रुपये आहे. तापसीने ट्विटरद्वारे यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘ओह.. हे कधी झालं मला कळालच नाही. मी या माझ्या यशाचा आनंद साजरा करायला हवा’ असे तिने ट्विटमध्ये म्हटले आहे. आता यंदाच्या वर्षातही तापसी बॉक्स ऑफिसवर जादू करणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यंदा तिचे रश्मी रॉकेट, हसीन दिलरुबा, शाब्बास मिथू आणि लूप लपेटा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

x