05 March 2021

News Flash

सलमानच्या मेहुण्यासोबत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचा डेब्यू

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून त्याची कथा भारतीय जवानांभोवती फिरणारी आहे.

सलमान खान, आयुष शर्मा

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान बऱ्याच कलाकारांसाठी गॉडफादर ठरलाय. सलमानने त्याचा मेहुणा आयुष शर्मालाही बॉलिवूडमध्ये लाँच केलं. पण आयुषचा पहिला चित्रपट ‘लव्हयात्री’ फ्लॉप ठरला. रोमॅण्टिक चित्रपटात आयुषची जादू न चालल्याने आता सलमानने वेगळा फंडा आणण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफीसवर देशभक्तीपर विषयांवर आधारित चित्रपटांची चलती पाहायला मिळतेय. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळतेय. म्हणूनच अशाच एका विषयावर सत्य घटनांवर आधारित चित्रपट सलमान प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटातून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफ पदार्पण करत आहे. आयुष आणि इसाबेलची नवीन जोडी यानिमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा केली आहे. करण ललित भूतानी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव ‘क्वाथा’ असं असणार आहे. चित्रपटाची कथा भारतीय जवानांभोवती फिरणारी असेल. कतरिनाच्या बहिणीच्या पदार्पणाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. अखेर तो मुहूर्त सापडला आहे. इसाबेलने न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. चित्रपटात नेमकी तिची काय भूमिका असेल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

आणखी वाचा : “तू एका आईचे मन दुखावले आहेस”; वीणाच्या आईने शिवानीला सुनावले

चित्रपटाचं शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून २०२० मध्ये तो प्रदर्शित होईल. सध्या इसाबेल व आयुष मिळून यासाठी तयारी करत आहेत. बॉलिवूडमध्ये आपली विशेष छाप सोडण्यात कतरिना तर यशस्वी ठरली. आता तिच्या बहिणीला बॉलिवूडमध्ये यश मिळतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचसोबत आयुषलाही या चित्रपटासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. पहिला चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आता या दुसऱ्या चित्रपटातून त्याला स्वत:ला सिद्ध करायचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 11:19 am

Web Title: this famous actress sister to make her bollywood debut with aayush sharma in kwatha ssv 92
Next Stories
1 “तू एका आईचे मन दुखावले आहेस”; वीणाच्या आईने शिवानीला सुनावले
2 मालदीवच्या किनाऱ्यावर मलायकाचा सुपर हॉट लूक; पाहा फोटो
3 दीपिका हॉटेलमधून चोरायची ‘ही’ वस्तू
Just Now!
X