13 August 2020

News Flash

या प्रसिद्ध अभिनेत्रीला आहे झोपेत चालण्याची सवय; चाहत्यांनी दिला सल्ला

ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्रीने केला खुलासा

इलियाना डिक्रूझ

‘बर्फी’, ‘रेड’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूझ गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांची संवाद साधला आणि त्यादरम्यान तिने स्वत:बद्दल खुलासासुद्धा केला. मला झोपेत चालण्याची सवय आहे, असं इलियानाने ट्विट करत सांगितलं.

”आता मी या गोष्टीला पूर्णपणे स्वीकारले आहे की मला झोपेत चालण्याची सवय आहे. सकाळी उठल्यावर माझ्या पायाला सूज असते किंवा एखादी छोटी जखम तरी असते. यामागचं कारण हेच असावं,” असं तिने लिहिलं. इलियानाच्या या ट्विटवर चाहत्यांनी तिला बरेच उपाय सांगितले, काहींनी सल्ले दिले. तुझ्या बेडरुममध्ये कॅमेरा लावून ठेव, त्यामुळे तुला झोपेत चालण्याच्या सवयीबद्दल स्पष्टपणे समजेल, असा सल्ला एकाने दिला. तर दुसऱ्याने तिला डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यास सांगितले.

सोशल मीडियावर इलियानाचे फॉलोअर्स बरेच आहेत आणि या माध्यमातून इलियानासुद्धा तिच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सांगताना दिसते. नुकतंच तिचं ऑस्ट्रेलियन प्रियकर अँड्र्यू नीबोन याच्याशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. इलियानाने तिच्या इन्स्टाग्रामवरून अँड्र्यूसोबतचे फोटो डिलीट केले. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 1:48 pm

Web Title: this famous bollywood actress do sleep walk fans gave amazing suggestions to her ssv 92
Next Stories
1 ..आणि असे झाले अमिताभ-जया यांचे शुभमंगल
2 …म्हणून इरफान दिसला व्हिलचेअरवर
3 विनोदाचे वारकरी
Just Now!
X