13 July 2020

News Flash

या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच मोडला ‘बाहुबली’चा विक्रम

'बाहुबली'ने रचलेले कमाईचे विक्रम मोडणं कोणत्याही चित्रपटासाठी सहजसोपं नव्हतं.

एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व विक्रम मोडले होते. या चित्रपटाने रचलेले विक्रम मोडणं कोणत्याही चित्रपटासाठी सहजसोपं नव्हतं. मात्र एका दाक्षिणात्य चित्रपटाने प्रदर्शनाच्याच दिवशी ‘बाहुबली’च्या कमाईचा विक्रम मोडला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनचा चित्रपट असून ‘अला वैकुंठप्रेमुलु’ असं त्याचं नाव आहे. शनिवारी (११ जानेवारी) हा चित्रपट प्रदर्शित झाला. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

अल्लू अर्जुनच्या या कौटुंबिक चित्रपटाने USA मध्ये ‘बाहुबली’च्या कमाईचा विक्रम मोडला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने दिलेल्या माहितीनुसार तब्बल ६० हजारांहून अधिक प्रिमिअरचे तिकिट विकले गेले.

आणखी वाचा : तैमुरमुळे सैफ-करीना झाले मालामाल; केला इतक्या कोटींचा करार 

या तेलुगू चित्रपटात तब्बू, पूजा हेगडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अरमान मलिक आणि श्रेया घोषालने यातील गाणी गायली आहेत. याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अल्लू अर्जुन म्हणाला, “बॉलिवूडच्या काही कलाकारांचे अभिनय कौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. कधी कधी आपल्याला चित्रपटात नाविन्य आणण्यासाठी बाहेरून कलाकार आणावे लागतात.” या मुलाखतीत अल्लू अर्जुनने बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छादेखील व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:32 pm

Web Title: this film broke bahubali record on the day of its release ssv 92
Next Stories
1 ८७ वर्षांच्या आजोबांचं ५२ वे ऑस्कर नामांकन
2 हृतिक-सुझानची पहिली भेट आणि ‘कहो ना प्यार है’चं कनेक्शन माहितीये का?
3 सगळ्या खिडक्या फोडा; सत्या नाडेलांच्या विधानावरून अभिनेत्याचा टोला
Just Now!
X