सध्या रिमेकचा जमाना आहे. हॉलिवूडच काय पण मराठी किंवा दाक्षिणात्य चित्रपटाचेही रिमेक आता बॉलिवूडमध्ये येत आहेत. हल्लीच ‘सैराट’ या मराठी चित्रपटाचाही ‘धडक’ हा रिमेक पाहायला मिळला. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट येऊन गेले, जे कोणत्या ना कोणत्या दाक्षिणात्य किंवा हॉलिवूड चित्रपटाचे रिमेक होते. ‘सोनी मॅक्स २’नं अशाच गाजलेल्या पाच रिमेक चित्रपटाची यादी प्रसिद्ध केली आहे तेव्हा हे चित्रपट कोणते ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१०० डेज: १९९१ मधील जॅकी श्रॉफ, माधुरी दिक्षित आणि जावेद या सुपरहिट आणि रहस्‍यमय थ्रिलरचे दिग्‍दर्शन पार्थो घोष यांनी केले होते. हा चित्रपट १९८४ मधील हिट तामिळ चित्रपट ‘नूरावथू नाल’चा रिमेक होता. तेलुगु आणि मल्‍याळममध्‍ये देखील या चित्रपटाचा रिमेक झाला. या सर्व चित्रपटांची कथा १९७८ हॉलिवूड चित्रपट ‘आइज ऑफ लॉरा मार्स’वर आधारित होती.

बागबान: सलमान खान, अमिताभ बच्‍चन, हेमा मालिनी यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पटकथा बीआर फिल्‍म्‍सच्‍या चार वेगवेगळ्या लेखकांनी लिहिली आहे. चित्रपटाची कथा बी. आर चोप्रा यांनी लिहिलेली असून ती जोसेपिन लॉरन्सची कादंबरी ‘इअर्स आर सो लाँग’वर आधारित आहे. १९३७ मध्‍ये प्रदर्शित झालेल्या ‘मेक वे फॉर टूमारो’ची कथा ही बागबानमध्ये पाहायला मिळते.

साहेब:  एका महत्‍त्‍वाकांक्षी फूटबॉलपटूच्‍या जीवनावर आधारित ‘साहेब’ हा चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला. १९८१मध्‍ये प्रदर्शित झालेला बंगाली चित्रपट ‘साहेब’चा हा हिंदी रिमेक होता. अनिल कपूर, अमृता सिंग व राखी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्‍दर्शन ७० व ८०च्‍या दशकातील लोकप्रिय चित्रपट निर्माता अनिल गांगुली यांनी केली. ‘साहेब’ या चित्रपटामध्‍ये अनिल गांगुली यांनी मुख्‍य भूमिका साकारली होती या चित्रपटाला भरपूर यश मिळाले होते.

बिच्‍छू: बॉबी देओल आणि राणी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बिच्‍छू’ चित्रपटाची कथा ही १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लिऑन द प्रोफेशनल’ या हॉलिवूडमधल्या हिट चित्रपटावर आधारित आहे. लोकप्रिय अॅक्‍शन हिरो ‘जीन रेनो’ने या चित्रपटात मुख्‍य भूमिका साकारली होती.

घर एक मंदिर:  १९८४ मध्‍ये प्रदर्शित झालेल्‍या या चित्रपटामध्‍ये शशी कपूर, मिथून चक्रवर्ती आणि मौसमी चॅटर्जी यांनी प्रमुख भूमिका साकारल्‍या आहेत. हा चित्रपट १९७८ मधील हिट तेलुगु चित्रपट ‘बोम्‍मारिल्‍लू’चा रिमेक आहे. तेलुगु चित्रपट निर्माता के.के. बापीया यांनी या चित्रपटाचे दिग्‍दर्शन केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This five bollywood movies are actully remake
First published on: 22-09-2018 at 16:59 IST