News Flash

VIDEO: हा उत्सव एकीचा..

ही जाहीरात हा उत्सव एकीने साजरा करण्याचा जणू एक संदेशच देऊन जाते.

VIDEO: हा उत्सव एकीचा..

दोन विविध धर्मियांमध्ये अमुक एका ठिकाणी हाणामारी किंवा अमुक एका ठिकाणी गदारोळ झाला, असे नेहमीच कानावर येते. पण, याच लोकांनी एकत्र येत समाजहिताचे किंवा इतर काही उल्लेखनीय काम केले हे क्वचितच कानावर येते. हीच विचारसरणी मोडीत काढत रमजान आणि इफ्तारच्या पार्श्वभूमीवर भाष्य करणारी एक जाहिरात सध्या यूट्यूब गाजवत आहे. अभिनेत्री सयानी गुप्ता, अर्चना पुरण सिंग यांचा सहभाग असणारी ही जाहीरात अवघ्या काही मिनिटांतच धर्मापलीकडली माणुसकी आणि सलोखा जपण्याची शिकवण देउन जाते. नफा मिळवण्याच्या पलीकडेही जात चेहऱ्यावर नकळतच हास्य खुलवणारी ही जाहीरात हा उत्सव एकीने साजरा करण्याचा जणू एक संदेशच देऊन जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 5:39 pm

Web Title: this heartening iftar ad ft archana puran singh sayani gupta will leave a smile on your face
Next Stories
1 VIDEO: सलमान, शाहरुख माझ्यापेक्षा मोठे स्टार, त्यांच्यासमोर मी काहीच नाही- आमिर खान
2 ‘दंगल’ नाव सलमानने दिले… आमिरची कबुली!
3 ‘आर्ची’ने उलगडले ‘रिंकू’ नावाचे रहस्य
Just Now!
X