गेल्या वर्षी सुरु झालेल्या ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आणि अन्याया विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्यांना काही काळासाठी बॉलिवूडमध्ये बॅन करण्यात आले होते. नुकताच आणखी एका अभिनेत्रीवर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना लैंगिक शोषण झाले असल्याचे समोर आले आहे. या अभिनेत्रीने एका मुलाखती दरम्यान या गोष्टीचा खुलासा केला आहे.

ही एक हॉलिवूड अभिनेत्री आहे. तिचे नाव कॅमिला मेंडेस (Camila Mendes) आहे. कॅमिला मेंडेसने नेटफ्लिक्सवरील ‘रिवरडेल’ या सिरिजमध्ये काम केले आहे. कॅमिलाने वुमन हेल्थ मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या अत्याचारांबाबत बोलतानाच इतर अनेक गोष्टींचाही खुलासा केला आहे. ‘मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये Tisch School of the Artsचे शिक्षण घेत होते. कॉलेजचे पहिले वर्ष माझ्यासाठी फारच कठीण होते. त्यावेळी माझे शारीरिक शोषण झाले होते’ असे कॅमिलाने सांगितले.

 

View this post on Instagram

 

it comes in handy that @beau_nelson is not only a talented makeup artist but also an amazing photographer

A post shared by camila mendes (@camimendes) on

‘कॉलेजचे पहिले वर्ष माझ्यासाठी फार कठीण काळ होता. दरम्यान मला अनेक वाईट अनुभव आले. एका व्यक्तीने मला ड्रग्स देऊन माझे लैंगिक शोषण केले होते’ असे कॅमिला पुढे म्हणाली. मात्र तिने त्या व्यक्तीचे नाव घेणे टाळले.