News Flash

गुगलवर सर्वाधिक सर्च होतेय ‘ही’ हॉट अभिनेत्री

ही अभिनेत्री आहे तीन मुलांची आई

प्रश्न कितीही कठीण असो, मोठा असो.. गुगलकडे उत्तर असतंच असं म्हणतात. कोणताही प्रश्न पडला तर सर्वांत आधी ‘गुगल सर्च’कडेच धाव घेतली जाते. मनोरंजनपासून ते अगदी विज्ञान, तंत्रज्ञान,शिक्षण अशा विविध विषयांवरील प्रश्नांची उत्तर गुगलवर सापडतात. या सर्चवरच आधारित ‘गुगल ट्रेण्ड्स’ वर्षाअखेर एक यादी जाहीर करते. वर्षभरात सर्वाधिक ट्रेण्डमध्ये असलेल्यांची यादी ‘गुगल ट्रेण्ड्स’ने नुकतीच जाहीर केली. पण या यादीत अभिनेत्री सनी लिओनी हिच नाव नव्हतं.

गुगल ट्रेण्ड्सने जाहीर केलेल्या यादीत अभिनंदन वर्धमान, लता मंगेशकर, युवराज सिंग, आनंद कुमार, विकी कौशल, ऋषभ पंत, रानू मंडल, तारा सुतारिया, सिद्धार्थ शुक्ला, कोईना मित्रा यांची नावं होती. पण जर बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून सर्च केलं असता सनी लिओनीचं नाव अग्रस्थानी येतं.

यामध्ये सनीचं नाव ८५ टक्के सर्च केलं जातं तर याउलट इंटरनेट सेन्सेशन रानू मंडल फक्त एक टक्का सर्च केल्या जातात. यामध्ये सलमान खान १८ टक्के, शाहरुख खान ८ टक्के तर अक्षय कुमार १२ टक्के सर्च केला जातो.

आणखी वाचा : बायोपिकचे हक्क देण्यासाठी सेलिब्रिटींना मिळाले इतके मानधन

या वर्षात ट्रेण्डमध्ये असलेल्या चित्रपटांमध्ये कबीर सिंगचं नाव अग्रस्थानी आहे. त्यानंतर अॅव्हेंजर्स: एंडगेम, जोकर, कॅप्टन मार्व्हल, सुपर ३०, मिशन मंगल, गली बॉय, वॉर, हाऊसफुल ४ आणि उरी हे चित्रपट आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 5:39 pm

Web Title: this hot actress is the most searched personality in google ssv 92
Next Stories
1 प्रियांकाने शेअर केला मांजरीचा व्हिडीओ; तुमच्या चेहऱ्यावरही येईल हसू
2 होऊ दे खर्च : विराट अनुष्कानं लग्नासाठी केलेल्या खर्चाचा आकडा माहिती आहे का?
3 ‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X