X

वरुण धवनच्या भाचीचे ‘हॉट’ फोटो पाहिलेत का?

सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ फेम अभिनेता वरुण धवनचा ‘जुडवा २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. प्रदर्शनापासून पाच दिवसांत चित्रपटाने ८५.३० कोटी रुपयांची कमाई केलीय. पण, सध्या वरुणपेक्षा त्याची भाचीच सर्वांच्या चर्चेचा विषय झाली आहे. अंजिनी धवन ही त्याची भाची असून, ती बरीच स्टायलिश असल्याचे तिच्या इन्स्टाग्राम फोटोंवरून दिसून येते. लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहणारी अंजिनी आजवर कधीच प्रसारमाध्यमांच्या समोर आली नाही. पण, सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत.

वाचा : हॉट फोटो शेअर करणाऱ्या मल्लिकाला नेटिझन्स ‘आन्टी’ म्हणतात तेव्हा…

वरुणचे काका अनिल धवन यांची ती नात आहे. तर सिद्धार्थ धवन हे अंजिनीचे वडिल आहेत. सिद्धार्थ आणि वरूण हे नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ लागतात. अनिल यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेय.

सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली अंजिनी तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. अवघ्या १७ वर्षांची असणाऱ्या अंजिनीचे इन्स्टाग्रामवर ७० हजार फोलोअर्स आहेत. श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर, भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन, संजय कपूरची मुलगी शनाया आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यांचा तिच्या मित्रमंडळींमध्ये समावेश आहे.

वाचा : शाहरुखला पुन्हा एकदा पालिकेचा दणका; ‘रेड चिलिज’च्या कार्यालयावर हातोडा

Outbrain