सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधात गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत हिंसक आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आतापर्यंत २० पेक्षा अधिक आंदोलकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संपूर्ण घटनेबाबत आता भारतीय कलाकारांबरोबरच विदेशी कलाकारही आवाज उठवत आहेत. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉन क्यूसेक याने दिल्ली हिंसाचारावरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला जॉन क्यूसेक?

जॉन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंबाबत तो नेहमीच मुक्तपणे व्यक्त होताना दिसतो. यावेळी त्याने दिल्ली हिंसाचारावरुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “हा फॅसिझम नाही तर काय आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष स्वत:च राष्ट्र असल्याचं मिरवतात. व त्याचवेळी तिथं दिल्ली जळत असते.” अशा शब्दांमध्ये जॉन क्यूसेक यांनं दिल्ली हिंसाचारावर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे.

ईशान्य दिल्लीतील विविध भागांमध्ये मंगळवारी दिवसभर बेफाम दंगलखोरांनी पोलिसांना न जुमानता चौकाचौकांमध्ये सशस्त्र हिंसाचार माजवला. या परिसरात अराजकतेने थैमान घातलेले पाहायला मिळाले. हिंसाचारप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मंगळवारी संध्याकाळी मौजपूर, चाँदबाग, जाफराबाद आणि करवालनगर या अतिसंवेदनशील बनलेल्या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सुरक्षेसाठी पाचही मेट्रो रेल्वे स्थानके बंद करण्यात आले आहेत. अन्य संवेदनशील भागांमध्ये जमाव बंदी लागू करण्यात आली असून सहा हजार पोलीस, शीघ्रकृती दलाचे जवान, निमलष्करी जवान तैनात केले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is fascism john cusack narendra modi donald trump delhi violence mppg
First published on: 27-02-2020 at 16:33 IST