News Flash

..जेव्हा वहीदा रहमान बिग बींच्या कानशिलात लगावतात

शूटिंग संपल्यानंतर बिग बी वहीदा यांच्याजवळ जाऊन म्हणाले...

अमिताभ बच्चन, वहीदा रहमान

‘द कपिल शर्मा शो’च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडच्या तीन दिग्गज अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन यांनी कार्यक्रमात त्यांच्या काळातील चित्रपट आणि सेटवरील बऱ्याच आठवणींना उजाळा दिला. त्याचसोबत शूटींगदरम्यान झालेले बरेच मजेदार किस्सेसुद्धा सांगितले. अभिनेत्री वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका चित्रपटात काम करतानाचा शूटिंगदरम्यान घडलेला एक किस्सा सांगितला.

वहीदा रहमान आणि बिग बींनी ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं. चित्रपटात वहीदा अमिताभ यांच्या कानशिलात लगावतात असं दृश्य होतं. त्यावेळी शूटिंगदरम्यान आपण खरोखर जोरदार कानशिलात लगावणार असं वहीदा यांनी बिग बींना सांगितलं होतं. या दृश्यासाठी अमिताभ बच्चनसुद्धा तयार होते. केवळ अभिनय वाटू नये म्हणून वहीदा यांनी खरोखरच बिग बींच्या कानशिलात लगावली होती. शूटिंग संपल्यानंतर बिग बी वहीदा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, ‘वहीदाजी, काफी अच्छा था.’ तेव्हा सेटवर हशा पिकला.

वाचा : ‘किंग खान’ची जादू ओसरली?; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब 

या प्रसंगाचा उल्लेख वहीदा रहमान यांनी एका पुस्तकातही केला होता. ते वाचून अभिनेते सुनील दत्तसुद्धा सावध झाले होते. कानाखाली मारण्याचे एखादे दृश्य चित्रपटात असल्यास केवळ अभिनय करावा, अशी विनंती सुनील दत्त यांनी केल्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 2:10 pm

Web Title: this is how amitabh bachchan had reacted when waheeda rehman slapped him on set
Next Stories
1 ‘किंग खान’ची जादू ओसरली?; सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमधून शाहरुख गायब
2 मलायका-अर्जुनच्या लग्नाबाबत प्रश्न विचारताच अरबाजने दिली ही प्रतिक्रिया
3 शाहरुखला ‘अंकल’ म्हणणाऱ्या सारावर चि़डले नेटकरी
Just Now!
X