01 October 2020

News Flash

प्रियांकाच्या सौंदर्यप्रसाधनांचा खर्च जाणून व्हाल थक्क!

आजपासून तिची 'क्वांटिको' ही मालिका सुरु होणार आहे.

प्रियांका चोप्रा जितकी मादक आणि प्रभावी आहे तितकीच ती सुंदर आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या अभिनयाची भुरळ बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने या माजी विश्व सुंदरींने सर्वांवर जादू चालवली आहे. आजपासून तिची ‘क्वांटिको’ ही मालिका सुरु होणार आहे. ‘क्वांटिको’ सिरीजचा हा दुसरा सिजन आहे. हे सर्व वगळता या देसीगर्ल विषयीची एक अशी गोष्ट आम्ही सांगणार आहोत जी जाणल्यावर तुम्ही थक्कच व्हाल.
प्रियांका चोप्रा जितकी मादक आणि प्रभावी आहे तितकीच ती सुंदर आहे. सेलिब्रिटी म्हटल्यावर प्रत्येक अभिनेत्रीला त्यांच्या सौंदर्याची काळजी घ्यावी लागते. प्रियांकालाही तिच्या सौंदर्याचे जतन करण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका दर महिन्याला सौंदर्यप्रसाधनांवर एक लाख रुपये खर्च करते. स्किन केयर प्रॉडक्डवर ती जवळपास महिन्याला ४२ हजार रुपये खर्च करते. तर मेकअप आणि हेअर केअरवर ती ३८ हजार रुपये खर्च करते. यात विविध शॅम्पू, कंडिशनर आणि सिरमचा समावेश असतो. याशिवाय ती वापरत असलेल्या परफ्यूमची किंमत १३ हजार रुपये इतकी आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘फोर्ब्स’ने सर्वाधिक कमाई करणा-या टेलिव्हिजन अभिनेत्रींची यादी जाहिर केली होती. त्यात प्रियांकाच्या नावाचाही समावेश होता. याचसह फोर्ब्सच्या टेलिव्हिजन यादीत सहभागी होणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणूनही तिने मान पटकाविला. ‘क्वांटिको’ या मालिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यास सुरु करणा-या या अभिनेत्रीने सदर यादीत आठवा क्रमांक पटकाविला होता. गेल्यावर्षी एबीसीच्या ‘क्वांटिको’ मालिकेमधून प्रियांकाने १.१ कोटी डॉलर एवढी कमाई केली. प्रियांकाचा सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या सिनेमातून तिच्या अभिनयाची अनेक स्थरांतून प्रशंसा करण्यात आली होती. याशिवाय ‘बेवॉच’ या चित्रपटातून ती हॉलिवूड चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे. या चित्रपटात ती ड्वेन जॉनसन या अभिनेत्यासोबत दिसेल. नुकताच तिचा हॉलिवूडच्या ‘द न्यू रॉयल रिस्ट’मध्ये समावेश करण्यात आला आहे. टाइम मासिकाने हे स्पष्ट केले आहे की, हॉलिवूडची ही रॉयल्टी यादी वंशानुसार न निवडता चांगल्या कामगिरीवर या यादीतील नावे निवडण्यात आली आहेत.

Team #Quantico… that’s how we roll. Thank you guys so much for watching with us! Big love see you next week

A video posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on

Alex fights in heels always!! #quantico

A photo posted by Priyanka Chopra (@priyankachopra) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 4:49 pm

Web Title: this is how much priyanka chopra spends on beauty products
Next Stories
1 ‘कॉफी विथ करण’ मधूनही फवादची गच्छंती..
2 द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारण्याची रिचाची इच्छा
3 भारताविरुद्ध वर्णभेदी ट्विट करणा-या पाकिस्तानी अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलने हाकललं
Just Now!
X