येत्या शुक्रवारी २५ जानेवारी रोजी बहुचर्चित ‘ठाकरे’ हा बायोपिक प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून महाराष्ट्राच्या राजकारणातील झंझावात व्यक्तिमत्वाचा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारत आहे.

तमाम हिंदू बांधवांच्या मनावर राज्य करणाऱ्या बाळासाहेबांसारख्या प्रभावी नेत्याची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणार कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यासाठी अनेकांची नावं चर्चेत होती. अगदी टिझर प्रदर्शित होण्यापूर्वी काही तास अगोदर अभिनेता अजय देवगण याचंही नाव चर्चेत होतं. अखेर ही भूमिका साकारण्याची संधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राऊत यांनीच पटकथा लिहिली आहे. या भूमिकेसाठी राऊत यांनी जेव्हा नवाजुद्दीनला भेटायला बोलावलं तेव्हा काय झालं, भूमिका मिळाल्यानंतर नवाजुद्दीनची पहिली प्रतिक्रिया काय होती, हे खुद्द त्यानेच लोकसत्ता डॉटकॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.