24 September 2020

News Flash

संजय दत्तला कर्करोग झाल्याचं सांगण्यासाठी डॉक्टरांनी अवलंबला ‘हा’ मार्ग

संजयला पडले होते अनेक प्रश्न

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक पोस्ट शेअर करत कामातून ब्रेक घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याला कर्करोग झाल्याचं सांगण्यात  आलं होतं. त्यातच आता त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. परंतु, संजयला कर्करोग झाल्याची माहिती कशी देण्यात आली हे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे कदाचित आपल्याला करोना झाला नाही ना अशी भीती संजयला होती. त्यामुळे त्याने घरातच ऑक्सिमीटरवर स्वत:च्या ऑक्सिजनची लेव्हल चेक केली होती. यातच त्याच्या ऑक्सिजनची पातळी खालावल्याचं दिसून आलं. त्यानंतर संजयला लीलावती रुग्णालयात करोना चाचणी करण्यासाठी घेऊन जाण्यात आलं. परंतु, त्याने यापूर्वीच करोना चाचणी केली असून त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं त्याने डॉक्टरांना सांगिलं होतं.

संजयचे रिपोर्टस चेक करत असताना त्याला अनेक प्रश्न पडत होते. तो डॉक्टरांना सतत प्रश्न विचारुन नेमकं काय झालंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे कदाचित तुला टीबी असेल किंवा इनफेक्शन झालं असेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर त्याला दोन दिवस रुग्णालयात रहावं लागलं. याच काळात त्याचं PET स्कॅन करावं लागेल असं सांगण्यात आलं. मात्र, याचदरम्यान हिस्टोपॅथोलॉजी डिपार्टमेंटमधून त्याच्या फ्लूइडमध्ये कॅन्सर सेल्स असल्याचं निदर्शनास आलं. इतकंच नाही तर पीईटी स्कॅनमध्येही त्याला कर्करोग झाल्याचं निदान झालं.

दरम्यान, संजयला कर्करोग झाल्याचं समजताच त्याचं समुपदेशन करण्यात आलं होतं. तसंच त्याला ऑन्कोलॉजिस्टकडे पाठविण्यात आलं आणि नेमके कसे उपचार करण्यात येतील याची सविस्तर माहिती दिली.  कर्करोगाचं निदान झाल्यानंतर संजय लवकरच विदेशात पुढील उपचारांसाठी जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:08 pm

Web Title: this is how sanjay dutt got news of lung cancer ssj 93
Next Stories
1 नताशाच्या बाळासोबतच्या फोटोवर सानियाने केली ‘ही’ कमेंट
2 सुशांतच्या बहिणीचा व्हिडीओ अंकिताने केला शेअर; केली CBI चौकशीची मागणी
3 ‘देवा श्री गणेशा’ मालिकेतील गणपती बाप्पाची खास झलक
Just Now!
X