01 March 2021

News Flash

Video : सुयश टिळकला अशाप्रकारे मिळाली बॉलिवूडची ऑफर

'खाली पिली' या चित्रपटात साकारली भूमिका

सुयश टिळक

मराठी कलाविश्वात ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुयश टिळकने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं आहे. ‘खाली पिली’ या चित्रपटात सुयशने नकारात्मक भूमिका साकारली आहे. बॉलिवूड चित्रपटाची ऑफर कशी मिळाली आणि त्यात काम करण्याचा अनुभव कसा होता, याबाबत सुयशने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

‘खाली पीली’ या चित्रपटात इशान खट्टर आणि अनन्या पांडे यांची मुख्य भूमिका असून झी प्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो प्रदर्शित झाला आहे. पहिलाच बॉलिवूड चित्रपट असल्याने तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही, याची खंत यावेळी सुयशने व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 2:38 pm

Web Title: this is how suyash tilak got his role for bollywood movie ssv 92
Next Stories
1 प्रसन्नसमोर उघड झालं सई आणि नचिकेतच्या प्रेमाचं सत्य
2 ‘क्रिश’, ‘रा-वन’ला टक्कर देणार शक्तिमान
3 ‘मी जिवंत आहे’, श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री
Just Now!
X