08 December 2019

News Flash

जाणून घ्या, ‘तुला पाहते रे’ मालिकेचा शेवट कसा होणार?

'तुला पाहते रे' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

'तुला पाहते रे'

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि इशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता या मालिकेचा शेवट कसा होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विक्रांतचा खरा चेहरा कळल्यावर इशा त्याला माफ करणार का आणि त्यानंतर विक्रांतचं काय होणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र या मालिकेचा शेवट थोडा वेगळा होणार असल्याचं समजतंय

इशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं विक्रांतला तिच्या बाबांकडून समजतं. हे कळल्यावर त्याला धक्काच बसतो. आपण केलेल्या कृत्यांमुळे अस्वस्थ होऊन विक्रांत आत्महत्येचं पाऊल उचलतो. मालिकेच्या शेवटच्या भागात विक्रांत आत्महत्या करणार असल्याचं कळतंय.

आणखी वाचा : ..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा

विक्रांतने आत्महत्या केल्यानंतर इशाचं काय होणार आणि मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. येत्या काही दिवसांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच कलाकारांनी फेअरवेल पार्टी केली होती.

First Published on July 20, 2019 1:04 pm

Web Title: this is how tula pahate re serial is going to end ssv 92
Just Now!
X