महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत १८० किलोमीटर पायपीट करत हजारो शेतकरी १२ मार्च रोजी मुंबईत दाखल झाले होते. विविध मागण्यांसाठी या शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मोर्चा काढला होता, ज्याला सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही या मोर्चावर प्रतिक्रिया दिली. ‘शहरात राहणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे,’ असं आमिरने म्हटलं. वाढदिवसानिमित्त आमिरने मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी त्याने हे मत मांडलं.

दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमिर नेहमीच पुढे सरसावला. त्यामुळे या पत्रकार परिषदेत त्याने शेतकरी मोर्चाचा आवर्जून उल्लेख केला.

AIB roast row: रणवीर सिंग, अर्जुन कपूरला तात्पुरता दिलासा नाहीच

आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त आमिर गेल्या काही दिवसांपासून जोधपूरमध्ये होता. मात्र, कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी तो मुंबईत परतला. पत्रकार परिषदेत त्याच्यासोबत पत्नी किरण रावसुद्धा होती. ५३व्या वाढदिवशी इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करत आमिरने चाहत्यांना अनोखी भेट दिली. अकाऊंट सुरू केल्यावर त्याने सर्वांत आधी आईचा फोटो पोस्ट केला. ‘आज मी जो काही आहे, तो तिच्यामुळेच आहे. म्हणूनच पहिला फोटो आईचा पोस्ट केला,’ अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

जेव्हा हॉकिंग आयुष्याबद्दल बोलतात…

जोधपूरमध्येच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी आमिर खानसुद्धा तिथेच होता. ‘अमिताभ सरांच्या खांद्याला आणि पाठीला थोडी दुखापत झाली आहे. मात्र आता त्यांची तब्येत बरी आहे,’ अशी माहिती त्याने दिली.