News Flash

मी काहीच करू शकत नाही; आलोक नाथ यांच्या पत्नीने केले होते हात वर

या संपूर्ण प्रकरणानंतर अर्थात विनता यांनी ही बाब आपल्या मैत्रिणीच्या कानावर का नाही घातली असा प्रश्नही त्यांना विचारला गेला.

बॉलिवूडमधले ‘संस्कारी बापुजी’ म्हणून आलोक नाथ यांची ओळख आहे. मात्र विनता नंदा यांच्या आरोपानं ‘संस्कारी बापुजीं’चा खरा चेहरा जगासमोर आला. विनता नंदा यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे आलोक नाथ यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आरोप केले. विनता नंदा आणि आलोक यांची पत्नी आशू सिंग यांचं नातं घट्ट मैत्रीचं होतं. विनता या आलोक नाथ यांची गाजलेली मालिका ‘तारा’च्या निर्मात्या होत्या.

या संपूर्ण प्रकरणानंतर अर्थात विनता यांनी ही बाब आपल्या मैत्रिणीच्या कानावर का नाही घातली असा प्रश्नही त्यांना विचारला गेला. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनता यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. ‘मी, आशुच्या कानावर घडलेला सर्व प्रकार त्यावेळी घातला होता, पण मी याविषयी काहीच बोलू शकत नाही किंवा काहीही करू शकत नाही असं सांगत तिनं असमर्थता दर्शवली होती’ असं विनता म्हणल्या.

आलोक नाथ यांची आरोपांवर प्रतिक्रिया
‘मी हे आरोप नाकारत नाही आणि स्वीकारतही नाही. ती घटना (बलात्कार) घडली असावी, पण कोणा दुसऱ्या व्यक्तीने तो केला असावा. मी या विषयावर अधिक बोलणार नाही कारण तितकाच तो ताणला जाईल. एकेकाळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आज तिने माझ्यावर इतके गंभीर आरोप केले आहेत. आज ती जे काही आहे, ते माझ्यामुळेच आहे. तिने केलेल्या आरोपांवर मी काही प्रतिक्रिया देणं निरर्थक आहे, कारण सध्याच्या घडीला महिला जे बोलते तेच सत्य मानलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल’ असं म्हणत विनता यांच्या आरोपांवर फार काही बोलण्यास आलोक नाथ यांनी नकार दिला आहे.

विनता नंदा यांची फेसबुक पोस्ट
वळपास 20 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. या अभिनेत्याची पत्नी माझी बेस्ट फ्रेंड होती. एक दिवस ती शहराबाहेर होती त्यावेळी त्याने मला एका पार्टीसाठी घरी आमंत्रित केलं. आमच्यासाठी ही सामान्य बाब होती. आमच्या थिएटर ग्रुपचे सर्व मित्र पार्टीत भेटत असतो. पार्टीमध्ये माझ्या दारुत काहीतरी मिसळण्यात आलं होतं. रात्री जवळपास दोन वाजेच्या सुमारास आम्ही त्याच्या घरातून बाहेर पडलो, त्यावेळी मला विचित्र वाटत होतं. मी माझ्या घराकडे निघाली. पार्टीतून निघताना मला कोणीही घरी सोडायला येण्याबाबत विचारलं नाही, याचं थोडं आश्चर्य वाटलं होतं. रस्त्यावर कोणीच नव्हतं आणि माझं घर दूर होतं. तेवढ्यात या अभिनेत्याची गाडी येऊन माझ्या बाजूला थांबली आणि त्याने मला घरी सोडण्याची ऑफर दिली. मी त्याच्या गाडीत बसले. गाडीत बसल्यावर मला बळजबरीने आणखी दारु मला पाजण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मी उठले त्यावेळी मला खूप त्रास होत होता. माझ्यावर केवळ बलात्कार झाला नव्हता तर माझं शोषण झालं होतं, मला क्रूर वागणूक दिली जात होती. मी माझ्या बेडवरुनही उठू शकत नव्हते. त्यानंतर मी याबाबत माझ्या मित्रांना सांगितलं, पण त्यांनीही मला झालेली घटना विसरु जा आणि पुढील जीवनाचा विचार कर असं सांगितलं. यानंतर माझी कंपनी बंद झाली पण मला एका चॅनलमध्ये संधी मिळाली. मात्र, या अभिनेत्याने त्या चॅनलमध्येही असं वातावरण तयार केलं की, मला दिग्दर्शक बनायचं नाहीये असं मला मालिकेच्या निर्मात्याला सांगावं लागलं. कारण मला त्या अभिनेत्याच्या आजुबाजूलाही राहायचं नव्हतं. पण माझ्यासाठी हे काम महत्त्वाचं होतं. कारण नोकरी सुटल्यानंतर मी खूप दडपणाखाली होते. मी जेव्हा त्या मालिकेसाठी कथानक लिहायला घेतलं त्यावेळी हा अभिनेता माझ्या घरी यायचा, पण त्यावेळी नोकरी आणि पैसे या दोन्ही गोष्टींची मला गरज होती. मोठी हिंमत एकवटून मी वेगवेगळ्या चॅनलसाठी लिहिण्याचं काम सुरू केलं. पण आता मला चित्रीकरणाची आणि त्या सेटची भीती वाटायला लागली होती. अखेर मी पराभव मान्य केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2018 1:55 pm

Web Title: this is what alok nath wife said on vinta nanda allegation
Next Stories
1 सलीम-सुलेमानचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण
2 Loveyatri box office collection : सलमानच्या १६० कोटींच्या अपेक्षेवर मेहुण्याने फेरले पाणी
3 #MeToo मोहिमेविषयी ऐश्वर्या राय -बच्चन म्हणते…
Just Now!
X