X

हृतिकने दिशासोबत फ्लर्ट केल्याच्या चर्चांवर टागयर म्हणतो..

हृतिक रोशनने टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानीसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगल्या होत्या. हृतिकच्या वैतागून दिशाने चित्रपट सोडल्याचीही बातमी समोर आली होती.

हृतिक रोशनने टायगर श्रॉफची प्रेयसी दिशा पटानीसोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये रंगल्या होत्या. हृतिकच्या वैतागून दिशाने चित्रपट सोडल्याचीही बातमी समोर आली होती. या संपूर्ण प्रकरणावर आता टायगर श्रॉफने मौन सोडलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात टायगरला दिशा व हृतिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

‘चर्चा आणि अफवा हे या इंडस्ट्रीत पसरतच असतात. हे फक्त हृतिक किंवा दिशाबद्दल घडतंय असं नाही. प्रत्येक कलाकाराला अशाप्रकारच्या घटनांमधून जावं लागतं. जेव्हा तुम्ही प्रकाशझोतात असता, तेव्हा सगळ्यांसाठी तुम्ही एक सोपं लक्ष्य बनता,’ असं उत्तर टायगरने दिलं. ‘अत्यंत बालिश मानसिकतेतून पसरवलेल्या त्या अफव्या होत्या. मी हृतिक आणि दिशाला चांगल्याप्रकारे ओळखतो. अशी कोणतीही गोष्ट घडली नव्हती,’ असंही तो पुढे म्हणाला.

वाचा : माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याबद्दल धन्यवाद; विवेक अग्निहोत्रीचा स्वराला टोमणा

हृतिकसोबत एका चित्रपटात काम करत असताना सेटवर त्याने दिशासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर हृतिकचाही पारा चढला आणि त्याने हे वृत्त छापणाऱ्या वेबसाइटवर ट्विटरच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला होता. तर दुसरीकडे दिशानेही हे वृत्त फेटाळत हृतिक चांगल्या मनाचा माणूस असल्याचं स्पष्ट केलं होतं.