25 February 2021

News Flash

आमिर खाननं मानले ‘खिलाडी’ अक्षय कुमारचे आभार

आमिरने अक्षयला केली होती विनंती

आमिर खान, अक्षय कुमार

बॉलिवूडमध्ये दर शुक्रवारी नवनवीन चित्रपटांची भर पडतच असते. अनेकदा एकाच आठवड्यात दोन-तीन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होते. याचा फटका अर्थात कलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांना बसतो. हे टाळण्यासाठी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यासाठी आमिरने अक्षय कुमारला विनंची केली होती.

जुलै २०१९ मध्ये अक्षयने ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित केला होता. त्यावेळी हा चित्रपट २०२० च्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले होते. तर २५ डिसेंबर २०२० रोजी आमिरचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता अक्षय कुमार आणि निर्माता साजिद नाडियादवाला यांनी ‘बच्चन पांडे’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.

आणखी वाचा : ‘तान्हाजी’ चित्रपटातील इतिहास किती खरा किती खोटा? ऐका त्यांच्या वंशजांकडून

अक्षय कुमारच्या निर्णयानंतर आमिरने सोशल मीडियावर लिहिलं, “कधीकधी फक्त संवादच पुरेसा असतो. माझा मित्र अक्षय कुमार आणि साजिद नाडियादवाला यांचे खूप खूप आभार… मी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. त्यांच्या चित्रपटासाठी माझ्याकडून शुभेच्छा.. ”

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खानची मुख्य भूमिका आहे. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. तर ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 2:43 pm

Web Title: this is why aamir khan thanked akshay kumar ssv 92
Next Stories
1 Video: ‘तान्हाजी’ चित्रपटातील इतिहास किती खरा किती खोटा? ऐका त्यांच्या वंशजांकडून
2 Video : अशोक सराफांची ही मुलाखत पाहून खळखळून हसाल!
3 Video : हृतिकची आईदेखील भन्नाट डान्सर
Just Now!
X