अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री काजोल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. मुंबईतील मराठी मंदिर चित्रपटगृहात तब्बल १००० आठवड्यांपर्यंत हा चित्रपट चालला होता. त्यातील संवाद आजसुद्धा अनेकांना तोंडपाठ आहेत. चित्रपटाची इतकी लोकप्रियता असतानाही काजोलचा पती अजय देवगण याने मात्र अद्यापही हा चित्रपट पाहिलेला नाही.
अजयने ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ हा चित्रपट अजूनही पाहिला नसून काजोलनेच याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं. काजोलने अनेकदा अजयला चित्रपट न पाहण्यामागचं कारण विचारलं. मात्र त्याने कधीच योग्य उत्तर दिलं नसल्याचं तिने सांगितलं. काजोल त्या मुलाखतीत म्हणाली, “अजयने हा चित्रपट न पाहण्यामागचं एक कारण असू शकतं, पण ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. यासाठी तुम्हाला त्याची मुलाखत घ्यावी लागेल आणि त्यालाच विचारावं लागेल.”
शाहरूख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला “दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’ १९९५ मध्ये प्रदर्शित झाला होता. आदित्य चोप्राचे पहिलेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाने ‘न्यू एक्सलसीयर’ चित्रपटगृहात ५० आठवडे साजरे केल्यानंतर तो मराठा मंदिरमध्ये झळकवण्यात आला. आजही हा चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2020 10:50 am