News Flash

..म्हणून ‘तान्हाजी’च्या सेटवर देवदत्तला पडलं ‘देवगण नागे’ हे नाव

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटात देवदत्त महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

‘जय मल्हार’ या मालिकेत खंडोबाची व्यक्तिरेखा साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक चित्रपटात देवदत्त सूर्याजी मालुसरेंची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने देवदत्तला अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली. या दोघांच्या स्वभावात व आवडीनिवडीत बरंच साम्य असल्याचं सेटवर अनेकांना जाणवलं.

‘पुणे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत देवदत्तने सेटवरच्या गमतीजमती सांगितल्या. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला ‘देवगण नागे’ असं नाव पडलं होतं. देवदत्तला गाड्यांची फार आवड आहे. त्याच्याकडे बाइक्स, सुपरबाइक्स आहेत, तर अजय देवगणच्या चित्रपटांमध्ये गाड्या उडवण्याची दृश्य हमखास असतात. देवदत्त सेटवर गाडी घेऊन गेला की अजय कौतुकानं त्या पाहायचा. त्यामुळे सेटवर देवदत्तला ‘देवगण नागे’ असं नाव पडलं. “आम्ही दोघंही दिसायला रावडी आहोत. त्यामुळे सेटवर अगदी दोघे भाऊच असल्यासारखं जमून गेलं,” असंही देवदत्तनं सांगितलं.

आणखी वाचा- फत्तेशिकस्त : बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते

मराठी चित्रपटाचा विचार करताना भूमिकेसाठी तूच मनात होतास, असं दिग्दर्शक ओम राऊत यांनी देवदत्तला सांगितलं. तेव्हा मला खूपच भरून आलं, अशी भावना त्याने या मुलाखतीत व्यक्त केली. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 11:40 am

Web Title: this is why devdatt nage called as devgn nage on the set of tanhaji the unsung warrior ssv 92
Next Stories
1 ‘तारक मेहता…’मधील या अभिनेत्रीचा काढता पाय
2 Video : रणबीरला दुखापत नक्की कशामुळे?, चाहते चिंतेत
3 फत्तेशिकस्त : बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते
Just Now!
X