News Flash

..म्हणून लांबणीवर गेला मलायका आणि अरबाजचा घटस्फोट?

पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर हे दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

मलायका अरोरा खान, अरबाज खान

यंदाचे वर्ष काही कलाकार जोड्यांसाठी तसे फारसे चांगले राहिले नाही असेच म्हणावे लागेल. त्यातही काही प्रसिद्ध बी टाऊन जोड्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांमध्येही विविध चर्चांना उधाण आले होते. बॉलिवूडमधल्या अशाच काही जोड्यांमध्ये चर्चेतील एक जोडी म्हणजे मलायका अरोरा खान आणि अरबाज खान. या दोघांनीही बऱ्याच काळापूर्वी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अठरा वर्षांच्या त्यांच्या या नात्यामध्ये आलेल्या दुराव्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण, वेगळे होणार असल्याचे जाहीर केल्यानंतरही मलायका आणि अरबाजने रितसर त्यांचे नाते मोडले नाहीए. एकमेकांपासून विभक्त होण्याच्या निर्णयानंतरही विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये मलायका आणि अरबाज अनेकदा प्रसारमाध्यमांच्या नजरेत आले आहेत. त्यामुळे हे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा विचार करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मलायका आणि अरबाज यांचा घटस्फोट होण्याचे जवळपास नक्की झाले होते. पण, तुर्तास दोघांच्याही कुटुंबांमुळे त्याच्या घटस्फोटामध्ये काही अडथळे येत आहेत. त्यामुळे सध्यातरी मलायका आणि अरबाजचा घटस्फोट लांबणीवर गेल्याची चर्चा आहे. मलायका १८ वर्षांची होती, तेव्हा ती अरबाजला पहिल्यांदा भेटली होती. एका जाहिरातीच्या शुटिंगच्या निमित्ताने १९९२ साली दोघांची पहिली भेट झाली. या जाहिरातीनंतर दोघेही प्रेमात पडले. पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 1:15 am

Web Title: this is why malaika arora khan and arbaaz khans divorce is on hold
Next Stories
1 ‘पद्मावती’मध्ये दीपिका-रणवीरदरम्यान ही अभिनेत्री निर्माण करणार दुरावा
2 प्रेग्नेन्सीच्या अटीमुळे झाला होता प्रियांकाचा वाद
3 ‘जॉन अब्राहम WWEच्या रिंगणात सीजरोची जागा घेऊ शकतो’
Just Now!
X