X
X

..म्हणून मराठी कलाकार पोस्ट करत आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो

READ IN APP

पुष्कर श्रोत्री, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांनी त्यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मिसेस मुख्यमंत्री मालिका आता एका रंजक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच सुमी-समरचं लग्न पार पडणार आहे आणि या लग्नाची धमाल तयारी सुरू झाली आहे. नुकतंच या दोघांनी प्री-वेडिंग फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यासोबतच मालिकेच्या या जोडीने मराठी कलाकारांना एक आव्हान दिलं आहे. कलाकारांना त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं हे चॅलेंज आहे आणि काहींनी हे स्वीकारलं आहे.

यामध्ये पुष्कर श्रोत्री, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांचा समावेश आहे. लग्नाच्या अल्बममधील फोटो शेअर करत या कलाकारांनी आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांना उजाळा दिला आहे.

छोट्या पडद्यावरील मिसेस मुख्यमंत्री ही मालिका काही काळातच हिट ठरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. समर-सुमी यांचं नातं एका वेगळ्याच परिस्थितीत सुरू झालं होतं आणि ते लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळा कायम लक्षात राहावा म्हणून हे दोघं हरएक प्रयत्न करताना दिसत आहे. मालिकेतील मिसेस मुख्यमंत्री साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे व मिस्टर मुख्यमंत्री साकारणारा अभिनेता तेजस बर्वे यांच्यातील केमिस्ट्रीलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

22
X