27 February 2021

News Flash

…म्हणून श्रद्धाने फरहानपासून लांब राहणंच पसंत केलं

इन्स्टाग्रामवर फरहानला केलं अनफॉलो

श्रद्धा कपूर, फरहान अख्तर

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर आणि सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अधुना अख्तर यांच्या घटस्फोटानंतर फरहानचं अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत नाव जोडलं गेलं. दोघांच्या लिंक अपच्या चर्चांनी जितका जोर धरलेला तितकाच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चाही ऐकायला मिळालेल्या. श्रद्धा आणि फरहान यांच्यातील दुरावा वाढला असून तिने इन्स्टाग्रामवर फरहानला अनफॉलो केलं आहे.

‘रॉक ऑन २’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांच्याबद्दल चर्चा होऊ लागलेली. इतकंच नव्हे तर श्रद्धा फरहानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचंही म्हटलं जात होतं. त्यावेळी श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी तिला फरहानच्या फ्लॅटमधून हाताला धरून बाहेर काढलं होतं. आता श्रद्धाने जरी इन्स्टाग्रामवर फरहानला अनफॉलो केलं असलं तरी तो मात्र अजूनही तिला फॉलो करत आहे.

शक्ती कपूर यांनी श्रद्धाला फरहानपासून लांब राहण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. सुरुवातीपासून त्यांना दोघांच्या मैत्रीवर आक्षेप होता. फरहानला दोन मुले असून त्याने पहिली पत्नी अधुना हिला घटस्फोट दिला आहे. याच कारणामुळे शक्ती यांना फरहान-श्रद्धाचं नातं पटत नसल्याचं कळतंय. त्यामुळे ‘आशिकी गर्ल’नेही फरहानपासून लांब राहणंच पसंत केलं आहे. काही दिवसांपूर्वी तिने पटना मॅरेथॉनच्या एका कार्यक्रमात फरहानसोबत स्टेज शेअर करण्यास नकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:01 pm

Web Title: this is why shraddha kapoor keeping distance from ex boyfriend farhan akhtar unfollows him on instagram
Next Stories
1 खऱ्या आयुष्यातील ‘राणा’सोबत अक्षयाचा गुपचूप साखरपुडा?
2 आईसोबत लपंडाव खेळण्यात मिशा दंग
3 ऐश्वर्या राय माझी आई, आंध्रप्रदेशमधील तरुणाचा दावा
Just Now!
X