24 September 2020

News Flash

कोण साकारतंय आंबेडकरांच्या बालपणाची भूमिका?

मालिकेतून उलगडणार आंबेडकरांचा बालपणापासूनचा प्रवास

डॉ. बाबासाहेब मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बालपणीच्या आंबेडकरांची भूमिका साकारतो आहे बालकलाकार अमृत गायकवाड. छोट्या अमृतचं सध्या सगळीकडेच कौतुक होतंय. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद. मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरु होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं.

अमृतचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची बालपणीच्या आंबेडकरांच्या भूमिकेसाठी निवड झाली. अमृत सेटवर सर्वांचाच लाडका आहे. दिग्दर्शक अजय मयेकरांच्या सूचनांचं तो काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच सीन अधिकाधिक खुलून येतात. मालिकेत अमृतच्या मोठ्या भावाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आनंदासोबत त्याचं नातं अधिक घट्ट आहे. आनंदाशिवाय एक क्षणही तो राहत नाही. हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचं शीर्षकगीतही अमृतने तोंडपाठ केलं आहे. सेटवर सतत तो हे शीर्षकगीत गुणगुणत असतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अभिनयाचं वेड असलेल्या अमृतला याच क्षेत्रात करिअर करायचं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका त्याच्या आयुष्यातला मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 4:48 pm

Web Title: this kid is portraying dr babasaheb ambedkar childhood role
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2 : दुसऱ्या पर्वाची पहिली नॉमिनेशन प्रकिया
2 करण जोहर-प्रबळ गुरुंगच्या अफेअरच्या चर्चा, जाणून घ्या सत्य
3 अनुराग कश्यपच्या मुलीला बलात्काराची धमकी, मोदी समर्थकाविरोधात FIR दाखल
Just Now!
X