‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या दोन्ही चित्रपटांच्या यशानंतर आता यावरील वेब सीरिज नेटफ्लिक्स प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. या वेब सीरिजमध्ये माहिश्मती साम्राज्याच्या राजमाता शिवगामी यांची कथा दाखवण्यात येणार आहे. ‘बाहुबली : बिफोर द बिगनिंग’ असं या सीरिजचं नाव असून यामध्ये एक मराठमोळा चेहरासुद्धा झळकणार आहे.

अभिनेत्री सोनाली खरे या वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने याबद्दलची माहिती दिली आहे. ‘नेटफ्लिक्सवरील या ऐतिहासिक वेब सीरिजमध्ये काम करायला मिळाल्याबद्दल मी खूप खूश आहे. या सीरिजमध्ये मला पाहण्यासाठी तुम्हीसुद्धा उत्सुक आहात का,’ असं तिने पोस्ट शेअर करत लिहिलंय.

https://www.instagram.com/p/Byt2kmTHAy9/

https://www.instagram.com/p/BxrFEDQH3a-/

या प्रिक्वल सीरिजमध्ये अभिनेत्री मृणाल ठाकूर शिवगामीची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता राहुल बोस स्कंददासाच्या भूमिकेत आहे. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत अभिनेत्री रम्या कृष्णा यांनी शिवगामीची भूमिका साकारली होती. वेब सीरिजमध्ये मृणाल ठाकूर, राहुल बोस, सोनाली खरे यांच्यासोबतच अतुल कुलकर्णी, वकार शेख, जामील खान, सिद्धार्थ अरोरा आणि अनुप सोनी यांच्याही भूमिका आहेत.