01 December 2020

News Flash

जर मी वेळीच तेथून निघाले नसते तर…, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला आहे

हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. तसेच सोशल मीडियावर या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईकने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सोशल मीडियाद्वारे सांगितला आहे.

मनवाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर प्रवासादरम्यान घडलेला प्रसंग सांगितला आहे. ‘मी गेल्या महिन्यात हरयाणा ते दिल्ली विमानतळ असा प्रवास रात्रीच्या साडे नऊच्या सुमारस करत होते. हृदयात धडधड सुरु होती. मनात निर्भयाचे विचार येत होते. मोबाईलमध्ये गुगल मॅप सुरु होता आणि एकीकडे व्हॉट्सअॅपद्वारे नवरा माझ्या संपर्कात होता. विमानतळावर मी सुखरुप पोहोण्यासाठी मनोमन प्रार्थना करत होते. टोल प्लाझाजवळ टोल भरण्यासाठी गाडी ड्रायव्हरने गाडीची काच खाली करताच तेथे उभे असणाऱ्या गणवेशातील ९ पुरुषांचे लक्ष माझ्याकडे गेले. मला पाहून एका पुरुषाने गाणे गाण्यास सरुवात केली अन् माझ्या हृदयाचे ठोकेच जणू काही थांबले. चालकाने लवकरात लवकर तेथून गाडी काढावी हाच विचार मनात येत होता. त्याप्रमाणे त्याने तेथून गाडी काढलीही. पण मी वेळीच तेथून निघाले नसते तर…’ असे तिने पोस्टमध्ये लिहित तिचा अनुभव सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

#photoshoot #actor #smiles #new #homes #library #manavanaik #mylene

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik) on

हैदराबादमध्ये पशुवैद्य महिलेवर २७ नोव्हेंबर रोजी टोल प्लाझा येथील परिसरात चार ट्रक चालकांनी बलात्कार केला होता. त्यानंतर तिला ठार करून त्यांनी तिचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळून टाकला होता. या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटनासमोर आल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 7:06 pm

Web Title: this marathi actress tells horrible incident happened with her avb 95
Next Stories
1 मिताली राजच्या बायोपिकची घोषणा; ‘ही’ बोल्ड अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका
2 … म्हणून ‘मर्दानी’ ठरला हिट, राणीने सांगितलं गुपित
3 प्रदर्शनापूर्वीच अक्षयच्या चित्रपटाचा विक्रम, शुटिंगसाठी उभारले तब्बल ३५ भव्यदिव्य सेट्स
Just Now!
X