गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रसारमाध्यमांपासून दूर जात इटलीत विवाहबंधनात अडकलेले विराट कोहली- अनुष्का शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर चाहत्यांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करणाऱ्या विराटने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर सध्या याच फोटोची जोरदार चर्चा असून या फोटोतून विरुष्का पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची ग्वाही देताना पाहायला मिळत आहेत. अनुष्कासोबतच्या या फोटोला ‘मी आणि माझी एकमेव..’ असं कॅप्शन विराटने दिलं असून हा फोटो अनेकांचं लक्ष वेधत आहे.

वाचा : अशी साकारली थरकाप उडवणारी ‘परी’

११ डिसेंबर २०१७ रोजी या सर्वांच्याच लाडक्या जोडीने विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या नात्यात आलेल्या या सुरेख वळणाबद्दल चाहत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विराट सध्या साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून अनुष्का तिच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दोघेही आपापल्या कामकाजात व्यग्र जरी असले तरी सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटर, इन्स्टाग्रामवरून अनुष्काच्या आगामी ‘परी’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझरसुद्धा विराट शेअर करत असतो.