News Flash

‘इंडियन आयडल’चा ‘हा’ विजेता ‘बिग बॉस’ १५ च्या घरात दिसणार का? चर्चेला उधाण!

राहुल वैद्य नंतर आता 'हा' लोकप्रिय गायक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

bigg boss-ott
(Photo-Loksatta File Image)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय, तितकाच वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. यंदा ‘बिग बॉस’ आपले माध्यम बदलणार आहे. काही आठवडे हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल ज्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर करताना दिसेल. त्यानंतर टीव्हीवर याचे सूत्रसंचालन सलमान खान करताना दिसेल. ‘बिग बॉस’ने त्याच्या नवीन सीजनची घोषणा करताच या सीजनमध्ये कोण दिसणार याची जोरदार चर्चा सुरू झाले आहे. बऱ्याच कलाकारांची नावे समोर आली आहेत. यात आता राहुल वैद्य नंतर ‘इंडियन आयडल’च्या पहिल्या सीजनचा विजेता अभिजीत सावंत देखील ‘बिग बॉस’च्या १५ व्या सीजनमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगत होती. यावर आता अभिजीत सावंतने आपले मत मांडले आहे.

अभिजीतने ‘पिंकविला’ला मुलाखत देताना ‘बिग बॉस’मध्ये त्याच्या सहभागा बद्दल खुलासा केला आहे. तो त्या मुलाखतीत म्हणाला की, “जर का अश्या चर्चा रंगत असतील तर त्या अफवा आहेत.” जेव्हा त्याला विचारले की जर का तुला ऑफर आली तर जाशील का? त्यावर तो म्हणाला की, “मी अजून काही ठरवलेलं नाही. असा कधी प्रश्न देखील माझ्या मनात आला नाही. ते फॅन्स आहेत जे खुप एक्साइटेड आहेत. मी सोशल मीडियावर अश्या बऱ्याच पोस्ट पाहिल्या. मात्र मी जेव्हा काही पोस्ट करतो त्यावेळेस सगळे मला हाच प्रश्न विचारतात की तु बिग बॉस मध्ये सहभागी होणार का? कारण आधीच्या सीजनमध्ये राहुल वैद्य होता. त्यामुळे आता सगळ्यांना असं वाटतं की आता मी बिग बॉस मध्ये सहभागी होणार.”

‘बिग बॉस’१५ व्या सीजनसाठी बऱ्याच कलाकारांची नावे समोर आली आहेत. तसंच आता बिग बॉसच्या घरात बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता बिग बॉस मध्ये कोण स्पर्धक सामील होणार यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता दिवसें दिवस वाढत चालली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2021 7:52 pm

Web Title: this popular singer and winner of indian idol might be in bigg boss season 15 aad 97
Next Stories
1 “इस बार हार उनकी होगी”; अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित
2 ‘आणि काय हवं ३’मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ
3 प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक
Just Now!
X