अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुशांत सिंग राजपूत आणि साराची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून यातील काही दृश्यांची सोशल मीडियावरही चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात साराच्या वडिलांची भूमिका साकारत असलेल्या नितीश भारद्वाज यांच्या एका संवादावरून सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. ‘नहीं होगा ये संगम फिर चाहे प्रलय ही क्यूं ना आ जाए,’ असा हा संवाद आहे. सारा आणि सुशांतच्या लग्नाला विरोध करताना त्यांचा हा संवाद आहे आणि यावरूनच विनोदी मीम्स व्हायरल होत आहेत.

पाहा मीम्स- 

अभिषेक कपूर दिग्दर्शित हा चित्रपट ७ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This scene from kedarnath movie is now a meme sara ali khan sushant singh rajput
First published on: 14-11-2018 at 09:57 IST