03 June 2020

News Flash

धक्कादायक! वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

हा अभिनेता एक यशस्वी डॉक्टर होता

एक डॉक्टर ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील यशस्वी अभिनेता सेतुरमण याचे गुरुवारी निधन झाले आहे. चेन्नईमधील राहत्या घरी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. वयाच्या ३६व्या वर्षी सेतुरमणने जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या मृत्यूनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

‘कन्ना लड्डू’ या चित्रपटामुळे सेतुरमण प्रकाश झोतात आला. या चित्रपटानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. पण त्याने काही निवडक चित्रपटांमध्येच काम केले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वालिबा राजा’, २०१७ मध्ये ‘सक्का पोडु पोडु राजा’ आणि २०१९ मध्ये त्याने ’50/50′ य़ा चित्रपटांध्ये त्याने काम केले. चित्रपटांसोबतच सेतुरमण अनेक टीव्ही शोमध्ये देखील दिसला होता.

सेतुरमण अभिनेता होण्यापूर्वी एक डॉक्टर आहे. त्याचा स्वत:चा दवाखाना आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याने अभियनसोडून पुन्हा दवाखान्यामध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्याच्या दवाखान्याचे नाव ‘जी क्लिनिक’ आहे.

सेतुरमणच्या निधनाची बातमी अभिनेता सतीशने ट्विटरद्वारे दिली आहे. ‘एक दु:खद बातमी आहे. अभिनेता आणि डॉक्टर सेतुरमणचे काही वेळापूर्वी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले आहे’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 4:33 pm

Web Title: this south indian actor died at the age of 36 avb 95
Next Stories
1 ‘मोठी माणसं फक्त नावापुरती’; हृतिकचा लहान मुलांसाठी खास संदेश
2 लॉकडाउनचा फटका बसलेल्या ९ कुटुंबांची हा अभिनेता घेतोय काळजी
3 Coronavirus : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने केली १.२५ कोटींची मदत
Just Now!
X