News Flash

पुनरागमन करु इच्छिणाऱ्या कपिलच्या मार्गातील ‘हा’ अडथळा माहितीये?

कपिलने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल शर्मा

विनोदवीर कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ‘फिरंगी’ चित्रपटातून कपिलने पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अभिनय कौशल्य दाखवून दिले. पण, प्रेक्षकांना मात्र अभिनेत्याच्या रुपातील कपिल फारसा भावला नाही. चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर कपिलने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रोमोचे चित्रीकरण करण्यासाठी कपिल लवकरच सुरुवात करणार असल्याचे कळत होते. चाहत्यांनाही त्याच्या पुनरागमनाविषयीची उत्सुकता लागून राहिली आहे. पण, आता मात्र कपिलच्या मार्गात काही अडथळे निर्माण झाल्याचे म्हटले जातेय.

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘सुपर डान्सर २’ हा डान्स रिअॅलिटी शो कपिलच्या मार्गातील अडथळा होत असल्याचे कळते आहे. काही महिन्यांपूर्वी आरके स्टुडिओमध्ये लागलेल्या आगीमध्ये ‘सुपर डान्सर २’ या कार्यक्रमाच्या सेटचेही नुकसान झाले होते. त्यानंतर ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर ‘सुपर डान्सर २’ चे चित्रीकरण सुरु करण्यात आले. सध्याच्या घडीला हा कार्यक्रम टीआरपी रेटिंगमध्येही बराच वरच्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्यातरी आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात करण्याची इच्छा मनी बाळगणाऱ्या कपिलला आणखी काही वेळ वाट पाहावी लागू शकते, असे म्हटले जातेय.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

दुसरा सेट मिळाला नाही, तर मग कपिलला ‘सुपर डान्सर २’चे पर्व संपेपर्यंत थांबावे लागणार आहे. त्यामुळे ‘द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या पर्वावर या सर्व परिस्थितीवर परिणाम होणार असल्याचे चित्र दिसतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 1:03 pm

Web Title: this thing is stopping comedian turned actor kapil sharma from comeback the kapil sharma show season 2
Next Stories
1 दीपिकाआधी हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘पद्मावती’
2 ‘एस दुर्गा’नंतर आणखी एक चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात
3 सारिका यांना त्यांचे घर परत मिळवून देण्यासाठी आमिरचा पुढाकार?