05 March 2021

News Flash

…म्हणून ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याने नाकारली ‘बिग बॉस १४’ची ऑफस

जाणून घ्या, कोण आहे हा अभिनेता

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ लवकरच या शोचं १४ वं पर्व सुरु होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वात कोणते सेलिब्रिटी पाहायला मिळणार याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कलाकाराने ‘बिग बॉस १४’ ची ऑफर नाकारल्याचं समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांची नाव चर्चेत येत आहेत. हे कलाकार बिग बॉसच्या नव्या पर्वात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या नावांमध्ये विघ्नहर्ता गणेश या मालिकेत झळकलेला अभिनेता कुलदीप सिंह याच्या नावाचीदेखील जोरदार चर्चा सुरु होती. कुलदीप लवकरच ‘बिग बॉस १४’ च्या घरात दिसणार असं म्हटलं जात होतं. परंतु, या चर्चांना कुलदीपने पूर्णविराम दिला असून तो बिग बॉसमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं आहे.

कुलदीपला ‘बिग बॉस १४’ ची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने स्पष्टपणे नकार दिला आहे. “मला बिग बॉसच्या घरात जाण्याची कधीच इच्छा नव्हती. मुळात हा खरंच फार चांगला रिअॅलिटी शो आहे. परंतु, बिग बॉसच्या घरात राहून ज्या गोष्टी घडतात त्या ज्या व्यक्ती सहन करु शकतो त्यांच्यासाठी हा योग्य प्लॅटफॉर्म आहे. मी हा ताण सहन करु शकत नाही. कारण जो कधीही भांडेल किंवा वाद घालत बसेल अशा स्वभावाचा मी माणूस नाहीये. त्यामुळे जर मी बिग बॉसच्या घरात गेलो तर त्या पर्वातील सगळ्यात वाईट स्पर्धक ठरेन. मला कोणासमोरही वाईट ठरायचं नाही त्यामुळे मी या कार्यक्रमात भाग न घेतलेलाच बरं”, असं कुलदीपने सांगितलं.

दरम्यान, कुलदीप छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनलिटी याच्या जोरावर त्याचे अनेक चाहते असल्याचं पाहायला मिळतं. कुलदीपने आतापर्यंत विक्रम और बेताल, कैसी ये यारियाँ,सीआयडी यासारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 1:09 pm

Web Title: this tv star turned down the offer of bigg boss 14 ssj 93
Next Stories
1 ‘ब्रीद २’मधल्या कलाकारांची संपत्ती माहितीये का? आकडा पाहून व्हाल थक्क!
2 कल्कीने बॉयफ्रेंडसोबतचा असा फोटो केला शेअर, चाहत्यांनी दिल्या मजेशीर कमेंट
3 सुशांतच्या मृत्यूमुळे अंकिताला बसला जबरदस्त धक्का; ट्विट करुन म्हणाली…
Just Now!
X