27 September 2020

News Flash

जेव्हा कलाकारांनी अॅडल्ट कॉमेडी करण्यास दिला होता नकार; वाचा ‘अमेरिकन पाय’चा रंजक किस्सा

ख्रिसला तर त्याच्यावर पॉर्न दिग्दर्शकाचा ठपका पडू नये ही चिंता सतावत होती.

‘थॉमस इयान निकोलस’, ‘टारा रीड’ व दिग्दर्शक ‘ख्रिस वीट्झ’ या त्रिकुटाचा चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा होता.

१९९९ साली प्रदर्शित झालेला ‘द अमेरिकन पाय’ हा इतिहासातील सर्वोत्तम अॅडल्ट कॉमेडी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. किशोरवयीन मुलांच्या शारीरिक व मानसिक अवस्थेत होणाऱ्या बदलांवर आधारित हा चित्रपट आहे. या विषयावर आजवर ‘द ४० इयर्स ओल्ड व्हर्जिन’, ‘द गर्ल नेक्स्ट डोअर’, ‘रोड ट्रिप’, ‘सेक्स ड्राईव्ह’ यांसारखे अनेक चित्रपट आले. परंतु प्रामुख्याने प्रेम, विनोद व रहस्यपटांच्या काळात किशोरवयीन मुलांच्या गंभीर समस्यांना विनोदी अंगाने वाट करुन देणारा ‘द अमेरिकन पाय’ हा पहिला विनोदीपट होता. पुढे निर्माते ख्रिस मूर यांनी या चित्रपटाने मिळवलेले यश पाहता लैंगिक समस्यांवर आधारित ‘द अमेरिकन पाय २’, ‘अमेरिकन वेडिंग’, ‘अमेरिकन रियुनियन’ यांसारखी अॅडल्ट विनोदीपट मालिकाच सुरु केली. परंतु १९९९ सालचा ‘द अमेरिकन पाय १’ हा चित्रपट या पठडीतल्या इतर विनोदीपटांच्या तुलनेने विशेष गाजला.

‘थॉमस इयान निकोलस’, ‘टारा रीड’ व दिग्दर्शक ‘ख्रिस वीट्झ’ या त्रिकुटाचा चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा होता. अनेक वर्षांनंतर हे त्रिकुट एका मुलाखतीसाठी एकत्र आले. दरम्यान त्यांनी १८ वर्षांपूर्वीच्या आपल्या अनुभवांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा दिला. ख्रिस मूर यांनी जेव्हा या चित्रपटाची कल्पना मांडली तेव्हा भरकटलेला दिग्दर्शक म्हणून त्यांना खिजवले होते. अनेक मोठ्या कलाकारांनी समाजातील आपली प्रतिष्ठा पाहून अॅडल्ट कॉमेडी करण्यास नकार दिला होता. थॉमस, टारा व ख्रिस या त्रिकुटानेही चित्रपटास थेट नकारच दिला होता. सर्वांच्या मते हा चित्रपट म्हणजे एक सेमी पॉर्न फिल्म होती. अभिनेत्री टारा रीडला त्यात कराव्या लागणाऱ्या न्यूड सीन्सची भिती वाटत होती. तर निकोलसला हा चित्रपट पाहून त्याचे आई-वडिल काय करतील? ही भिती वाटत होती. ख्रिसला तर त्याच्यावर पॉर्न दिग्दर्शकाचा ठपका पडू नये ही चिंता सतावत होती. परंतु शेवटी या तिघांनीही मुक्तपणे व्दिअर्थी लैंगिक संभाषण करणाऱ्या या चित्रपटास होकार दिला.

चित्रपट प्रदर्शनादरम्यान प्रशासकीय विरोध व प्रेक्षकांच्या गोंधळाची भीती निर्मात्यांना सतावत होती. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपट सुपरहिट झाला. तरुण वर्गाच्या खास पसंतीस उतरला आणि त्या नंतर अॅडल्ट कॉमेडीपटांचा जणू ट्रेंडच सुरु झाला. या मुलाखतीमुळे द अमेरिकन पाय आज अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या चर्चेत आहे. या चित्रपट मालिकेतील विनोदी संभाषणांच्या क्लिप्स इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या आहेत. दरम्यान चाहत्यांनी त्यावर आपल्या प्रतिक्रीया देत त्यातील कलाकारांकडे ‘द अमेरिकन पाय’च्या पुढच्या भागांची मागणी देखील केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 11:56 am

Web Title: thomas ian nicholas and tara reid interview on american pie reunion
Next Stories
1 Video : ‘त्या’ गाण्याने केली कमाल! प्रभुदेवाला म्हणू लागले ‘भारताचा मायकल जॅक्सन’
2 जयाप्रदा यांच्या सुप्रसिद्ध ‘डफली वाले’ गाण्याचा हा मजेशीर किस्सा माहितीये का?
3 Video : अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मीचा ‘हा’ डान्स एकदा पाहाच
Just Now!
X