News Flash

‘थॉर’चा देसी अंदाज, व्हिडीओ झाला व्हायरल

या व्हिडीओमध्ये तो शाहरुखचा लोकप्रिय डायलॉग बोलताना दिसत आहे

बॉलिवूड कलाकार आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळते. याच कलाकारांचे लाखो चाहते असतात. त्याचप्रमाणे त्यांची लोकप्रियता साता समुद्रापार असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा अनेक हॉलिवूड कलाकार बॉलिवूड कलाकारांचे लोकप्रिय डायलॉग बोलताना दिसतात. नुकताच अशाच एका हॉलिवूड अभिनेत्याचा बॉलिवूडचा किंग खानचा डायलॉग बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचे दिसत आहे.

हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थ सध्या त्याचा नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपट ‘ढाका’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बँकॉग येथे सुरु आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान क्रिसचा सेटवर मस्ती करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिसचा देसी अंदाज दिसत आहे. तो अभिनेता शाहरुख खानचा ‘बडे- बडे शहरों में छोटी-छोटी बातें होती रहती हैं’ डायलॉग बोलता दिसत आहे.

क्रिसचा हा व्हिडीओ आर्टिस्ट रुद्राक्ष जायस्वालने शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत क्रिसने ‘हा क्रिस हेम्सवर्थ आहे जो हिंदी डायलॉग बोलत आहे. खरतर त्याच्या स्पॅनिशपेक्षाही त्याने हिंदी डायलॉग चांगला बोलला आहे. खूप मस्त व्हिडीओ आहे’ असे रुद्राक्षने म्हटले आहे. रुद्राक्ष हा क्रिस हेम्सवर्थचा चित्रपटात कोस्टार आहे. क्रिस हेम्सवर्थला बहुतेक लोक थॉर म्हणून विशेष ओळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 3:56 pm

Web Title: thor chris hemsworth speaks shah rukh khan film ddlj dialogue avb 95
Next Stories
1 ड्रायव्हरचे महिलेबरोबर गैरवर्तन, वरुण संतापला आणि…
2 CAA: राजकारणाचं भजं झालंय- मकरंद अनासपुरे
3 नक्षलवादी म्हणणाऱ्या ट्रोलरला अनुराग कश्यपनं झापलं
Just Now!
X