News Flash

अभिनेत्री शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात

शमिताच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे.

शमिता शेट्टी

बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीच्या गाडीला अपघात झाला आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी शमिताच्या गाडीला मोटारसायकलने धडक दिली. या अपघातातून शमिता बचावली असून तिच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे.

ठाण्यातील व्हिवियाना मॉलजवळ हा अपघात झाला आहे. याप्रकरणी शमिताने राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शमिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दखल घेत तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणेच पुढील तपास सुरु झाला आहे.

दरम्यान, शमिताने ‘मोहब्बते’ सारख्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र शमिताच्या या चित्रपटानंतर ती फार कमी चित्रपटांमध्ये झळकली. चित्रपटांनंतर शमिताने तिचा मोर्चा वेब सीरिजकडे वळविला होता. ‘यो के हुआ ब्रो’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती. त्यानंतर ‘खतरों के खिलाडी’च्या ९ व्या पर्वातही तिने सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 12:16 pm

Web Title: three bikeborne men rammed into actress shamita shetty
Next Stories
1 श्रद्धाने आपल्या १३ वर्षाच्या चाहतीची ‘ती’ इच्छा केली पूर्ण
2 आला रे आला रोहित आला… ‘सिम्बा’च्या कमाईतील ५१ लाख दिले मुंबई पोलिसांना
3 एकता कपूर झाली आई
Just Now!
X