मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ब-याच विशेष घडामोडी घडत आहेत…
एल. व्ही.  शिंदे ग्रुपच्या वतीने एक-दोन नव्हे तर एकदम तीन मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे हे देखिल विशेषच. त्यांचा पहिला चित्रपट ‘आजोबा’ पूर्णतेच्या मार्गावर आहे. सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटात उर्मिला मातोंडकरची मध्यावर्ती भूमिका आहे. तीस-बत्तीस वर्षांपूर्वी उर्मिलाने ‘संसार’ व ‘झाकोळ’ या मराठी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका केली होती.
शिंदे ग्रुपचे दुसरे दोन चित्रपट एस. के. प्रॉडक्शन फिल्म्स या बॅनरसोबत आहेत. त्यातील ‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज  मंजुळे करीत आहे, तर दिग्दर्शक प्रकाश कुंटे ‘कॉफी आणि बरेच काही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.
या चित्रपटाच्या नावावरून वेगळेपण सूचित हेते हे महत्वाचे. चित्रपटाचा वाढता निर्मिती खर्च, नामवंत कलाकार यापेक्षा आशय व सादरीकरण याना महत्व देण्याच्या भावनेतून असे काही वेगळे चित्रपट ‘आकारास’ येतात.