वीरे दी वेडिंग या चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये सक्रिय झालेली अभिनेत्री नुकत्याच ‘फन्ने खान’ या चित्रपटामध्ये झळकून आली. ऐश्वर्याच्या ‘फन्ने खान’ने बॉक्स ऑफिसवर फारशी जादू चालविली नसली तरी ऐश्वर्याची चर्चा मात्र जोरदार झाली. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या पहिल्यांदाच रॉकस्टारच्या भूमिकेमध्ये झळकली होती. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी ऐश्वर्याच्या चाहत्याने तिचा एका जुना फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो सर्वत्र व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या फॅन क्लबवर शेअर झालेल्या या फोटोमध्ये ऐश्वर्या प्रचंड सुंदर दिसत आहे. ज्यावेळी ऐश्वर्या मॉडेलिंग करत होती. त्यावेळचा हा फोटो असून यामध्ये अॅशने पांढऱ्या रंगाचा क्रॅपटॉप आणि ब्ल्यु कलरची जीन्स घातली आहे. तसंच या कपड्यांना सुट होतील असं कानातलेही तिने घातले आहेत. त्यामुळे ऐश्वर्याचा फॅशनसेन्स हा वाखाणण्याजोगा असल्याचं यावरुन दिसत आहे.

दरम्यान, बॉलिवूडचं ऐश्वर्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचा फॅशनसेन्स या पूर्वीपासूनच उत्तम असल्याचं हा फोटो सांगत आहे. ऐश्वर्या आता एका मुलीची आई आहे. मात्र, असं असलं तरीदेखील तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Throwback aishwarya photo her modelling days proves she was born fashionista
First published on: 16-08-2018 at 17:37 IST