News Flash

Throwback Thursday : आपण यांना ओळखलंत का?

दर गुरूवारी 'Throwback Thursday ' चा ट्रेंड इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतो. यावेळी अर्जुन कपूरनं लहानपणीचा फोटो शेअर करून जून्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अर्जून कपूरनं लहानपणीचा फोटो शेअर करून जून्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जुने किंवा लहानपणीचे फोटो गुरुवारी Throwback Thursday हॅशटॅग वापरून इन्स्टाग्राम किंवा अन्य सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंड काही नवा नाही. यानिमित्तानं आपले लाडके सेलिब्रिटी पूर्वी कसे दिसायचे हे पाहण्याची संधी चाहत्यांना मिळते. तेव्हा दर गुरूवारी ‘Throwback Thursday ‘ चा ट्रेंड इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतो. यावेळी अर्जुन कपूरनं लहानपणीचा फोटो शेअर करून जून्या आठवणींना उजाळा दिला आहे.

एका बर्थ डे पार्टीचा हा फोटो होता. यात अर्जुनसोबत रणबीर आणि सिंधान्त कपूरही होते. ‘९० च्या मुलांना स्निकरची फॅशन २०१८ पर्यंत कायम असेल हे आधीपासूनच माहिती होतं. रणबीरच्या हाय वेस्ट पँटकडे तर बघा’ असं लिहित अर्जूननं मोस्ट स्टाईलिश रणबीरच्या फॅशन सेन्सची खिल्लीही उडवली आहे.

तर दुसरीकडे सोनाक्षीनं देखील याच वाढदिवसाच्या पार्टीतला श्रद्धासोबतचा फोटो शेअर केला आहे. ‘नेहमीचप्रमाणे मी काहीतरी खाण्यात व्यस्त आहे आणि माझ्यासोबत बर्थ डे पार्टीत श्रद्धा आहे. सुदैवानं मी आता बारीक झाले आहे.’ असं लिहीत सोनाक्षीनंही आपला ‘Throwback Thursday ‘ मुव्हमेंट शेअर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 6:20 pm

Web Title: throwback thursday arjun kapoor trolls ranbir kapoor
Next Stories
1 का आली दिशावर ट्रोल होण्याची वेळ?
2 ‘छोटी मालकीण’मध्ये वर्षा दांदळेची धमाकेदार एण्ट्री
3 आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार
Just Now!
X