25 February 2021

News Flash

सलमानमुळे ऐश्वर्याने गमावला होता ‘चलते चलते’? ऐनवेळी राणीच्या पदरात आली मुख्य भूमिका

पाच चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसणार होते मात्र अचानक ऐश्वर्याची गच्छंती करण्यात आली होती

'चलते चलते' हा शाहरूख- राणीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता.

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय ही जोडी ‘देवदास’, ‘जोश’ यांसारख्या चित्रपटात दिसली. ही जोडी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांत झळकली असती मात्र ‘चलते चलते’ सह शाहरूखसोबतच्या पाच चित्रपटातून ऐश्वर्याची त्यावेळी गच्छंती करण्यात आली.

‘चलते चलते’ हा शाहरूख- राणीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटाला दहा वर्षांहून अधिकचा काळ लोटला. या चित्रपटात सुरूवातीला ऐश्वर्या राय बच्चन प्रमुख भूमिकेत होती. चित्रपटाचं चित्रीकरणही ऐश्वर्यानं सुरू केलं होतं मात्र तडकाफडकी शाहरूखनं ऐश्वर्याला काढून राणीला महत्त्वाची भूमिका दिली. त्यावेळी ऐश्वर्या आणि सलमानच्या अफेअरची चर्चा होती. सलमाननं मद्यपान करून ‘चलते चलते’च्या सेटवर धुमाकूळ घातला होता अशाही चर्चा त्यावेळी होत्या. या कारणामुळे वैतागून ऐश्वर्याला काढून राणी मुखर्जीला घेण्याचा निर्णय शाहरुखनं घेतला होता.

‘वीर झारा’, ‘कल हो ना हो’ आणि अन्य तीन चित्रपटात शाहरूख ऐश्वर्या एकत्र काम करणार होते मात्र त्यावेळी या पाचही चित्रपटातून ऐश्वर्याचं नाव वगळण्यात आलं. ‘देवदास’ चित्रपटानंतर १४ वर्षे ही जोडी चित्रपटात दिसली नाही. त्यानंतर करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटात शाहरूख आणि ऐश्वर्या अगदी छोट्या भूमिकेत झळकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 4:46 pm

Web Title: throwback thursday in chalte chalte shah rukh khan replaced aishwarya rai due to salman khan
Next Stories
1 ‘जरा तरी लाज बाळगा’; भाजपा नेत्याला सिनेअभिनेत्रींनी सुनावले
2 अशी होती करिना-साराची पहिली भेट
3 ‘हाऊसफुल ४’मध्ये हास्याचा डबल धमाका; मुलीसोबत जॉनी लिव्हर झळकणार
Just Now!
X