21 April 2019

News Flash

फ्लॉप ‘ठग्स’ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट कमाई

चकाकतं ते सोनं नसतं असं म्हटलं तरी कमाईच्या बाबतीत हा चित्रपट वरचढ ठरला आहे.

ठग्स ऑफ हिंदोस्तान

आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’नं प्रेक्षकांची घोर निराशाच केली. या बहुप्रतीक्षित चित्रपटाला सगळ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली. प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करणारा चित्रपट ठरला असला तरी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

‘ठग्स’ने पहिल्याचदिवशी ५० कोटींची कमाई केल्याचा अंदाज Boxofficeindia.com नं वर्तवला आहे. यापूर्वी दिवाळीत प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटानं ३९ कोटींहून अधिकची कमाई केली होती. त्यामुळे दिवाळीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड प्रेक्षकांच्या दृष्टीनं ‘फ्लॉप’ ठरलेल्या ‘ठग्स’नं मोडला आहे.

दिवाळीत या चित्रपटाव्यतिरिक्त कोणताही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तसेच सलग सुट्ट्या असल्यानं प्रेक्षक  चित्रपटगृहाकडे वळत आहेत. हिंदी व्यतिरिक्तही अन्य भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं याचा फायदा चित्रपटाला होता आहे. विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिकिटांचं प्री बुकिंग करण्यात आलं होतं. या प्री-बुकिंगमधूनच ठग्सनं २७ कोटी रुपये कमावले होते. यापूर्वी प्री- बुकिंगमधून ‘बाहुबलीनं’ सर्वाधिक कमाई केली होती.

First Published on November 9, 2018 11:10 am

Web Title: thugs of hindostan box office collection day 1