21 April 2019

News Flash

प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत Thugs of Hindostan लीक

या वेबसाईटवरून अनेक चित्रपट लीक झाले आहे. म्हणूनच वेबसाईटवर योग्य ती आणि कठोर कारवाई करावी असं मत अनेकांनी मांडलं आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट आज (८ नोव्हेंबरला) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही तासही उलटत नाही तोच तो ऑनलाइन लीक झाला. ‘तमिलरॉकर्स’ या पायरसीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वेबसाईटवरून तो लीक झाला आहे. यापूर्वीही या वेबसाईटवरून अनेक चित्रपट लीक झाले आहे. म्हणूनच या वेबसाईटवर योग्य ती आणि कठोर कारवाई करावी असं मत अनेकांनी मांडलं आहे.

‘तमिलरॉकर्स’ या वेबसाईटवरून यापूर्वी काही चित्रपट लीक झाले होते. काही महिन्यांपूर्वी रजनीकांत यांचा काला चित्रपटदेखील याच वेबसाईटवरून लीक झाला होता. तेव्हा देखील प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबधीत साईटवर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता ठग्स ऑफ हिंदोस्तानही लीक झाल्यानं ही मागणी आणखी जोर धरू लागली आहे.

आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांकडून नापसंती मिळताना दिसून येत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अजिबातच आवडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सगळ्यांनीच चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

First Published on November 8, 2018 4:37 pm

Web Title: thugs of hindostan full movie leaked online by tamilrockers