News Flash

Video : ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील बिग बींचा लूक पाहिलात का?

'खुदाबक्श, ठग्सचा सेनापती' अशी ओळख बिग बींच्या भूमिकेची करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन

आमिर खानचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ सध्या फारच चर्चेत आहे. कारण सोमवारी या चित्रपटाचा लोगो प्रदर्शित झाला आणि त्यानंतर आता चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या या मोशन पोस्टरमध्ये बिग बी साकारत असलेल्या भूमिकेचं नावं आणि त्यांचा लूक पाहायला मिळत आहे.

‘खुदाबक्श, ठग्सचा सेनापती’ अशी ओळख बिग बींच्या भूमिकेची करण्यात आली आहे. आमिरचा हा चित्रपट प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाइफ’चा अनुभव नक्कीच देणार असं म्हणायला हरकत नाही. हातात तलवार, अंगावर चिलखत, डोक्यावर बांधलेला फेटा आणि नजरेतून व्यक्त होणाऱ्या बिग बींचा असा अंदाज सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. एका मोठ्या जहाजात उभा असलेला ‘खुदाबक्श’ युद्धासाठी तयार असल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे.

बिग बींच्या लूकनंतर आता या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली असून इतर कलाकारांचे फर्स्ट लूक पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये आमिर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:50 pm

Web Title: thugs of hindostan meet the commander of thugs amitabh bachchan watch video
Next Stories
1 पहिल्यांदाच एकत्र झळणार सुमित -मृणालची जोडी
2 अनुप जलोटा यांच्याशी असलेल्या नात्याविषयी जस्लीनचे वडील म्हणतात…
3 Ganesh Utsav 2018 : पाहा, गणरायासाठी प्रिया बापटची स्वरसाधना
Just Now!
X