22 October 2020

News Flash

Thugs of Hindostan : भेटा ‘ठग्ज’च्या सुरैय्या जानला!

कतरिनाचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानने हा फोटो शेअर केला आहे.

सुरैय्या

आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत प्रदर्शित होणारा या वर्षीचा सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. काही दिवसापूर्वीच या चित्रपटात बिग बी साकारणार असलेल्या भूमिकेवरुन पडदा उचलण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एका कलाकाराची भूमिका स्पष्ट झाली असून तिचाही लूक प्रदर्शित झाला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील कतरिना कैफच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला असून तिचा लूक प्रदर्शित झाला आहे. कतरिनाचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला आमिरने साजेशी कॅप्शनही दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कतरिना एका वेगळ्या लूकमध्ये दिसत असून तिचा नवा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. कतरिनाचा हा फोटो पाहता ती या चित्रपटामध्ये बेली डान्स करताना दिसून येणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी या कतरिनाच्या ठग्समधील एका डान्समधील लूक लीक झाला होता.


‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 1:39 pm

Web Title: thugs of hindostan teaser katrina kaif look motion poster release aamir khan suraiyya
Next Stories
1 नील -रुक्मिणीला कन्यरत्न!
2 Sacred Games 2 : ‘इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’
3 तगडी स्टारकास्ट असलेला ‘मी शिवाजी पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X