22 September 2020

News Flash

हेमांगी म्हणतेय..‘तुला शिकवीन चांगलाच धडा’

नाटकात प्राध्यापकाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आहेत.

‘ती फुलराणी’

‘ती फुलराणी’ नाटक लवकरच नव्या संचात रंगभूमीवर; हेमांगी कवी व डॉ. गिरीश ओक यांची जुगलबंदी रंगणार

मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटय़कृती ‘ती फुलराणी’ पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर दाखल होत आहे.  भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष यांच्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीच्या रूपाने नवी फुलराणी रंगभूमीला मिळणार आहे.

अष्टगंध एन्टरटेन्मेंट निर्मित व एडोनिस अ‍ॅव्हिएशन एन्टरप्रायजेस प्रकाशित ‘ती फुलराणी’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर सादर होणार आहे. नाटकात प्राध्यापकाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक आहेत.

गेली अनेक वर्षे या नाटकाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले असून ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी साकारलेली ‘फुलराणी’ रसिकांच्या अद्याप स्मरणात आहे. भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी यांच्या अभिनयाची जुगलबंदी मूळ नाटकात पाहायला मिळाली होती. त्यानंतर अन्य अभिनेत्रींनी ही फुलराणी साकारली, तेव्हा संजय मोने, अविनाश नारकर यांची ‘प्राध्यापक’ म्हणून साथ त्यांना लाभली.

‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व’ पु.  ल.  देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उलगडलेले हे नाटक आता नव्याने अभिनेते व दिग्दर्शक राजेश देशपांडे दिग्दर्शित करत आहेत. नाटकात मीनाक्षी जोशी, रसिका धामणकर, नितीन नारकर, प्रांजल दामले, विजय पटवर्धन, नीरंजन जावीर, हरीश तांदळे, दिशा दानडे, सुनील जाधव, अंजली मायदेव हे कलाकार आहेत. मूळ नाटकाच्या संहितेत कोणतेही बदल करण्यात आले नसून तांत्रिक बाबतीत थोडे बदल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 3:30 am

Web Title: ti phulrani natak
Next Stories
1 इरफान खान आंतरराष्ट्रीय चित्रपटाची सहनिर्मिती करणार
2 पुरुष साजरा करतील तेव्हाच खरा ‘वूमन्स डे’ – तेजस्विनी पंडित
3 VIDEO: कंगनाची सहायकावर आगपाखड!
Just Now!
X