अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर कायम धुमाकूळ घालताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर हॉट लूकमुळे एका अभिनेत्याची जोरदार चर्चा सुरुय. अ‍ॅक्शन आणि स्टंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफने सोशल मीडियावर एक फोटो नुकताच शेअर केलाय. या फोटोने बॉलिवूड सेलिब्रिटींसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरुन देखील टायगर जिम करतानाचे तसचं स्टंट करतानाचे अनेक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मात्र टायगरने नुकताच त्याचा एक शर्टलेस फोटो इन्साग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय. त्याच्या या फोटोने अनेक तरुणींना घायाळ केलंय.

टायगर श्रॉफने  गुलाबी शॉर्ट मधले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. फ्लोरल शॉर्टमधल्या या फोटोला टायगरने ‘आह..क्यूट शॉर्ट ब्रो’ असं कॅप्शन दिलंय. टायगरच्या या फोटोवर दिशा पटानीने कमेंट केलीय. ‘यो..ब्रो.. खरचं खुप कमाल शॉर्ट आहे’ अशी कमेंट दिशाने केलीय.

तर राहुल बोस रॉय यानेदेखील टायगरच्या फोटोला कमेंट करत त्याचं कौतुक केलंय. एवढचं नाही तर टायगरची आई आएशा श्रॉफ यांनी कमेंटमध्ये हार्टच्या स्माईली देऊन टायगरचा फोटोला पसंती दिलीय. या फोटोत टायगरच्या पिंक शॉर्टसोबत त्याच्या सीक्स अ‍ॅब्सदेखील सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

टायगर श्रॉफ त्याचे मार्शल आर्ट्स आणि डान्सचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. सध्या टायगर त्याचा आगामी सिनेमा ‘गणपत’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. सोबतच तो ‘हिरोपंती-2’ सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.