अभिनेता टायगर श्रॉफ याने त्याच्या फिटनेस आणि अ‍ॅक्शनमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. टायगर कायमच त्याच्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकताच टायगरने एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून चाहते टागरचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओत टायगर हवेत गिरकी घेत किक मारताना दिसतोय. त्याच्या हा स्पिन किकचा व्हिडीओ  13 लाखाहून अधिक चाहत्यांनी पाहिलाय. या व्हिडीओचं अनेक सेलिब्रिटींनी देखील कौतुक केलंय. अभिनेत्री दिशा पटानीने टाळ्यांचे इमोजी दिले आहेत. तर अनेकांनी हार्टचे इमोजी देऊन व्हिडीओला पसंती दिलीय.

या व्हिडीओला टायगरने एक खास कॅप्शन दिलंय. “मी माझ्या आगामी सिनेमासाठी नव्या स्पायडरमॅनच्या खेळातील काही मूव्स चोरल्या तर चालेल ना!” असं कॅप्शन टायगरने तिच्या व्हिडीओला दिलंय. मुळात शांत स्वभाव असलेल्या टायगरने या कॅप्शनमधून काही ट्रोलर्सना चिमटे काढले आहेत.

काही दिवसांपूर्वीच टायगरच्या ‘हिरोपंती-2’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालंय. मात्र काही नेटकऱ्यांनी हे पोस्टर हॉलिवूड सिनेमातून कॉपी केल्याचं म्हणत टायगरला ट्रोल केलं.‘हिरोपंती २’ या चित्रपटाचा पोस्टर काल टायगरच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आलं होता. टायगरने स्वत: त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केलं. मात्र २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिटमॅन या हॉलिवूड सिनेमाचं पोस्टर कॉपी केल्याचं म्हणतं नेटकऱ्यांनी लगेच मीम्स तयार करत टायगरला ट्रोल केलं.

त्यामुळेच टायगरने त्याच्या कॅप्शन मधून ट्रोल करणाऱ्यांना चिमटे काढले आहेत.
दरम्यान, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटात टायगर सोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करत असून निर्मिती साजिद नाडियादवाला करत आहेत. हा चित्रपट १६ जुलै २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.