News Flash

टायगर श्रॉफने दिशाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला…

टायगरने अनोख्या स्टाईलमध्ये दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मादक फोटो आणि व्हिडीओजमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. यावेळी ती अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत आहे. टायगरने एक व्हिडीओ पोस्ट करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्हालाही आपले हसू रोखता येणार नाही.

 

View this post on Instagram

 

3 waffles and 3 pancakes later …happy birthday rockstar @dishapatani

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा भन्नाट डान्स करताना दिसत आहे. परंतु हा डान्स करताना तिने आपल्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव उमठू दिले नाहीत. परिणामी हा व्हिडीओ थोडा गंमतीशीर वाटतोय. “३ वेफल्स, ३ पॅनकेक्स. हॅप्पी बर्थडे रॉकस्टार” असं म्हणत टायगरने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिशा पटानीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टायगरने पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही जणांनी तिच्या डान्सचे कौतुकही केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 3:38 pm

Web Title: tiger shroff birthday post for disha patani mppg 94
Next Stories
1 VIDEO : “ही तर सुपरस्टार”; चिमुकलीचा डान्स पाहून हृतिकही झाला थक्क
2 भारतीय खेळाडूंनी माफी मागावी असं म्हणणाऱ्या स्वरा भास्करला सॅमीचं उत्तर, म्हणाला…
3 अभिषेकचा डिजिटल डेब्यु; ‘या’ सीरिजमध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Just Now!
X